ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

बडनेरात मनसेच्या कबड्डी सामन्यांचे उद्घाटन

– आमदार रवि राणा यांच्या उपस्थितित कारसेवकांचा सत्कार

शहराध्यक्ष गौरव बांते यांचा उपक्रम

कार्यक्रमाची सुरुवात हनुमान चालीसा म्हणून करण्यात आली

पंकज हिरुळकर अमरावती जिल्हा प्रतिनिधि;

बडणेरा- मनसेच्या दनदनीत कबड्डी सामन्याचे उद्घाटन बडणेरा विधानसभेचे आमदार रवी राणा यांच्या हस्ते व मनसे नेते पप्पू पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सावता मैदान येथे मंगळवारी पार पडले. यावेळी स्थानिक ज्येष्ठ नागरिक दिगांबर तायडे यांच्या हस्ते कारसेवकांचाही सत्कार करण्यात आला. आमदार रवी राणा यांनी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सदैव प्रयत्नरत राहील, असे आश्वासन याप्रसंगी दिले. तसेच गौरव बांते यांच्या प्रत्येक उपक्रमाला माझा पाठिंबा असतो त्याचप्रमाणे त्यांनी सूचविलेल्या विकासामांना निधी उपलब्ध करून देण्यासाठीही मी मागे हटणार नाही, अशी ग्वाही आ.रवी राणा यांनी दिली. स्पर्धेचे आयोजक तथा बडनेरा शहराध्यक्ष गौरव बांते यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. शहरातील विकासकामांचा पाठापुरावा करण्यासह खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठीही आपण प्रयत्नरत राहू, असे आश्वान गौरव बांते यांनी उपस्थितांना दिले. मनसे नेते पप्पू पाटील, कार्यक्रमाचे अध्यक्ष रवींद्र बारापात्रे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे मुख्य आयोजक मनसे शहराध्यक्ष गौरव बांते, जनहित जिल्हा संघटक प्रवीण डांगे, शहराध्यक्ष धीरज तायडे, शहराध्यक्ष हर्षल ठाकरे, कामगार सेना चिटणीस विक्की थेटे, उपजिल्हाध्यक्ष सचिन बावनेर, गजानन काजे, तालुकाध्यक्ष निलेश मुधोळकर, महिला सेना जिल्हाध्यक्ष रिना जुनघरे, उपजिल्हाप्रमुख संगीता मडावी, राज्य कार्यकारणी सदस्य सुशील पाचघरे, जनहित संघटक बबलू आठवले, प्रसिद्धी प्रमुख पवन सावरकर, उपाध्यक्ष मयंक तांबुस्कार, आश्विन सातव, साजन हिवरकर, विनोद गद्रे, सागर शेंडे, निखिल आर्मळ, युवा स्वाभिमान शहराध्यक्ष अजय जयस्वाल, नाना आमले तसेच प्रभाकर केने, मधुकर श्रीखंडे, दिगंबर तायडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

तसेच प्रियंका बांते, वैष्णवी पांडे, निलेश सोनोने, सौरभ बाते, गोलू हरणे,वेदांत अतकरी, विनोद गदे्र, पराग धुमाळे, संकेत बांते, नीलेश सोनोने, शुभम शिरभाते, ज्ञानेश्वर लांडे, राजू ढोरे, आदित्य कावरे, अमोल किंदरले, अभिमन्यू डहाके, अक्षय बारपत्रे, अभिशेख लोखंडे, यश काठघडे, नीलेश कदम यांच्यासह इतरही कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले. उद्घाटनपर कार्यक्रमानंतर कबड्डीच्या सामन्यांना प्रारंभ झाला.

error: Content is protected !!