ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

इंदिरा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय दहिगाव रेचा येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

– महेंद्र भगत अंजनगाव सुर्जी तालुका प्रतिनिधी

अंजनगाव सुर्जी तालुक्यातील दहिगाव रेचा येथील प्रख्यात असलेली इंदिरा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, प्रा.जी.व्ही. साबळे कॉन्व्हेंट स्कूलच्या प्रांगणामध्ये 75 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून दि.दयाराम पटेल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अनंत गुणवंत साबळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तर अनंत साबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला असून, विद्यार्थ्यांच्या परेडची मानवंदना सुद्धा स्विकारली.

कार्यक्रमाची रूपरेषा म्हणून वर्ग 8 ते 12 च्या विद्यार्थ्यांनी कवायत सादर केली. याप्रसंगी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. तसेच कॉपीमुक्त अभियानाची शपथ 10 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांनी देण्यात आली. 10 वी व 12 वीच्या फेब्रुवारी/ मार्च 2023 च्या झालेल्या परीक्षेमध्ये प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. प्रथम बक्षीस म्हणुन वर्ग 10 विची विद्यार्थीनी श्रुतिका गजानन वाघमारे हिचा पहिला क्रमांक पटकावला तर साक्षी सुरेश इंगळे हिने दुसरा आणि ईश्वरी अनिल जढाळे ही तिसऱ्या क्रमांकावर तसेच वर्ग 12 वी मधुन श्रद्धा सुभाष कराळे, ही पहिल्या क्रमांकावर तर दिव्या वासुदेव सपकाळ ही दुसऱ्या क्रमांकावर आणि ऋतुजा नरेश खडसे ही विद्यार्थिनी तिसऱ्या क्रमांक पटकाविला असुन, या सोबतच विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. प्रा.जी.व्ही.साबळे कॉन्व्हेंट स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मनमोहक देशभक्तीपर तसेच सामाजिक नृत्य सादर केले.

इंदिरा गांधी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शेतकरी आत्महत्या व त्यांना दिलासा देणाऱ्या गीतावर आधारित नृत्य सादर करून उपस्थितांचे मन हेलावून टाकले. कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध राज्यांच्या वेशभूषेवर आधारित अतिशय सुंदर पोशाख धारण करून नृत्य सादर केले. याप्रसंगी इंदिरा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य हिरे सर यांनी अध्यक्ष पद भूषविले होते.

गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच इंदिरा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांचे पालक, गावकरी या सर्वांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली व त्यांनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले. याप्रसंगी प्राध्यापक हेमंत मंगळे यांनी सूत्रसंचालन केले तर शिक्षक वसंत ढोके यांनी आभार प्रदर्शन केले सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी फार मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला व अतिशय सुंदर कार्यक्रम साजरा झाला.

error: Content is protected !!