ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्षपदी सारिका मानकर यांची नियुक्ती

पंकज हिरुळकर अमरावती जिल्हा प्रतिनिधि;

अंजनगांव सुर्जी : अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या सारिका मानकर यांची महिलांचे लढाऊ आणि वैचारिक संघटन असलेल्या जिजाऊ ब्रिगेडच्या अंजनगाव सुर्जी तालुकाध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे.

सारिका मानकर या कुशल संघटक आहेत. मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेडमध्ये त्या गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. तालुक्यातील विविध सामाजिक उपक्रम, आंदोलने, मोर्चे यामध्ये त्या नेहमी सहभागी असतात. आज जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा हर्षा ढोक यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन त्यांची तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. यापुढेही आपण जिजाऊ ब्रिगेडचे कार्य वाढविण्यासाठी व शिव-फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी आणखी ताकदीने कार्य करू असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. या कार्यक्रमाला जिजाऊ ब्रिगेडच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षा मयुरा देशमुख, प्रदेशाध्यक्षा सीमा बोके, प्रदेश कार्यकारिणी सदस्या लिनता पवार, मनाली तायडे, प्रा.डॉ. वैशाली गुडधे, मीना कोल्हे, स्मिता लहाने, सुषमा साबळे, शालिनी धोटे, जिया साबळे आदींसह अनेक महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. सारीका मानकर यांच्या या नियुक्तिमुळे त्यांच्यावर सर्व स्तरावरुन अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

error: Content is protected !!