ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

एन.ए.बी.निवासी अंधकार्यशाळेचे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत यश

सोलापूर संपादक – महेश पवार

प्रतिनिधी- संतोष विभुते

जागर संविधानाचा अभियानाअंतर्गत भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त घेण्यात आलेल्याराज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा 2024 मध्ये एन.ए.बी.निवासी अंधकार्यशाळेच्या हर्षद पुंडगे या विद्यार्थ्यांने राज्यस्तरीय चौथा क्रमांक पटकाविला. त्याबद्दल जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुनील खमितकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
निवृत्त जिल्हा न्यायाधीश तथा डायरेक्टर ऑफ प्रोसोक्युशन सोपानराव पंढरीनाथ निकम यांच्या हस्ते ट्रॉफी,प्रमाणपत्र व तीन हजार रुपये रोख बक्षीस देण्यात आले.स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच अकलूज येथे पार पडला. हर्षदने मिळविलेल्या यशाबद्दल कौतुक करुन जिल्हा समाजकल्याण अधिकारी खमितकर यांनी त्याचा सत्कार केला.यावेळी वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता सच्चिदानंद बांगर,नॅबचे रामचंद्र कुलकर्णी यांच्यासह जिल्ह्यातील दिव्यांग शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.
या स्पर्धेसाठी कार्यशाळेचे प्रमुख रामचंद्र कुलकर्णी व रियाज मुल्ला यांचे मार्गदर्शन मिळाले.

error: Content is protected !!