ब्रेकिंग न्युज
अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगीमराठा आरक्षणासाठी 32 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवनभाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरगेवराई तालुक्यातील ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरला डिझेल वाचून वारंवार ब्रेकशेती विकत नसल्याने महिलेचा विनयभंग करून पतीस मारहाण सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होणार

गंगाई फार्मसी कॉलेजची वेगवेगळ्या औषधी फिल्डला भेट

गंगाई फार्मसी कॉलेजची वेगवेगळ्या औषधी फिल्डला भेट
आष्टी प्रतिनिधी ;-कडा येथील आनंद चॅरिटेबल संस्था संचलित गंगाई फार्मसी कॉलेज कडा च्या विद्यार्थ्यांनी सोमवार दिनांक 29 जानेवारी रोजी वेगवेगळ्या औषधी क्षेत्रामधील फिल्डला भेट दिली. यामध्ये अहमदनगर येथील बोरा फार्मसुटीकल्स औषध कंपनी, डॉ. गोपाळ बहुरूपी व डॉ. बोरकर यांचे न्यूक्लिअस हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, ऋषिकेश काळे यांच्या अत्याधुनिक मेडिकल फार्मसी स्टोर व एजन्सी मेड बाजार फार्मा व सर्जिकल तसेच राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ या ठिकाणी असलेल्या औषधी वनस्पती गार्डन ला कॉलेजच्या 83 विद्यार्थी व त्यासोबत 13 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी भेट दिली.
    संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री मा.आ. भीमरावजी धोंडे साहेब यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देत असताना शहरी भागामध्ये जे शिक्षण मिळते त्या सर्व सुविधा त्यांनी त्यांच्या कॉलेजमध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत व त्याच अनुषंगाने त्यांच्या कॉलेजमध्ये सर्व उपक्रम राबवले जातात त्याच धर्तीवर व पी.सी.आय. च्या सिलॅबस नुसार औषधी क्षेत्रातील वेगवेगळ्या फिल्ड व्हिजिट आयोजित करण्यात आल्या. यासाठी संस्थेचे डायरेक्टर डॉ. अजय दादा धोंडे व श्री अभय राजे धोंडे यांनी मार्गदर्शन केले.
अहमदनगर येथील बोरा फार्मासिटिकल्स या औषध कंपनीमध्ये विद्यार्थ्यांना औषध कसे तयार होते त्यासाठी कोणकोणत्या मशनरी लागतात, मशनरी कशा काम करतात व त्यांना कसे हाताळायचे, औषधाची पॅकिंग कशी होते, लेबलिंग कशी केली जाते आणि  औषधे स्टोर कसे केले जातात या सर्व गोष्टीची माहिती त्या ठिकाणी असलेल्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना फार सुंदररित्या दिली. त्यामुळे विद्यार्थी कॉलेजवर थेरी व प्रॅक्टिकल शिकतातच परंतु औषध कंपनीमध्ये जाऊन औषध कसे तयार होते याची माहिती विद्यार्थ्यांना मिळाली.
अहमदनगर येथील न्युक्लिअस हॉस्पिटल व रिसर्च सेंटर या ठिकाणी थोडे थोडे विद्यार्थ्यांचा ग्रुप करून विद्यार्थ्यांना हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी  सर्व डिपार्टमेंट ची माहिती दिली तसेच त्या ठिकाणी असलेल्या आय.सी.यू. सेंटर व सेमी आयसीयू सेंटर हेही विद्यार्थ्यांना दाखवले व त्या ठिकाणी असलेल्या सर्व उपकरणांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. याबद्दल डॉ. गोपाळ बहुरूपी, डॉ. बोरकर यांचे प्राचार्यांनी आभार मानले
   राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ या ठिकाणी असलेल्या औषधी वनस्पतीच्या गार्डनची पाहणी विद्यार्थ्यांनी केली. त्या ठिकाणी असलेले ऑफिसर इन्चार्ज डॉ. जांभळे सर यांनी विद्यार्थ्यांना खूप सुंदर मार्गदर्शन केले त्या ठिकाणी जवळजवळ साडेचारशे पेक्षा जास्त औषधी वनस्पती होत्या त्याचा अभ्यास विद्यार्थ्यांनी केला पुढील आयुष्यात विद्यार्थ्यांना याचा नक्कीच फायदा होईल.
    नवीन सिल्याबस प्रमाणे विद्यार्थ्यांना आता मेडिकल स्टोअर, कम्युनिटी फार्मसी, मेडिकल स्टोअर एजन्सी यालाही भेट देणे आवश्यक आहे तसे विद्यार्थी सुट्टीच्या दिवशी जवळ असलेल्या या स्टोअरला भेट देतच असतात परंतु यावेळी  विद्यार्थ्यांनी अहमदनगर येथील मेड बाजार फार्मा व सर्जिकल या फार्मसी स्टोरला व त्यांच्या एजन्सीला भेट दिली. त्या ठिकाणी यावेळी ऋषिकेश काळे यांनी व त्यांच्या स्टाफ ने विद्यार्थ्यांना खूप मार्गदर्शन केले.  यावेळी श्री औदुंबर शिंदे व नानासाहेब लांडगे यांनीही मदत केली.
या औषधी फिल्ड भेटीचे प्रोत्साहन संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. डी बी राऊत सर, श्री शिवदास विधाते सर,  श्री दत्तात्रय गिलचे सर, श्री माऊली बोडखे सर, श्री संजय शेंडे सर यांनी दिले. या औषधी फीड व्हिजिट साठी 83 विद्यार्थ्यांना घेऊन कॉलेजचे प्राचार्य श्री अशोक बी गदादे तसेच  राहुल दानवे, साईनाथ पांढरे, काजल देवकर,  ज्योती वैद्य, अनिकेत डाके, रागिनी सोळंके, हर्षद नाकाडे,   श्री राऊत, भाऊसाहेब कणसे,  विकास अनारसे व सुजीत अनारसे हे गेले होते.
error: Content is protected !!