ब्रेकिंग न्युज
आष्टी येथे होणाऱ्या शरदचंद्रजी पवार यांच्या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – राम खाडेविकासात्मक नेतृत्व असलेल्या पंकजाताई मुंडे यांना सर्वाधीक मताने विजयी करा -आ.सुरेश धसबाफना पॉलिमर्स जामखेडचे नाव जागतिक पातळीवरजामखेड शहरात डॉ सुजय विखेंच्या प्रचारासाठी महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या काॅर्नर सभाडाॅ.सुजय विखे पाटील यांच्या पाठीशी खंबीर पणे उभा राहणार – प्रमोद सदाफुलेशारदा स्पोर्टस्‌‍ ॲकॅडमीच्या माध्यमातून ग्रामीण खेळाडू नावारुपाला आले – अमरसिंह पंडितमाऊली कोचिंग क्लास ची गुणवंत विद्यार्थीनी कु.श्रुती पांचाळ चे स्कॉलरशिप परीक्षेत घवघवीत यश.भगवंताचे चिंतन करुन शुद्ध अंतकरणाने भक्ती करावी भगवंताची प्राप्ती होतेअलंकापुरीतील इंद्रायणी नदी ला जलप्रदूषणासह जलपर्णीची विळखाकामगार हा व्यावसायिकांचा कणा-श्रीकांत अष्टेकर स्नेह-75-सायंतारा ग्रुपतर्फे कामगार दिन साजरा

कोट्यवधी मध्यमवर्गीय कुटुंबासाठी अर्थमंत्र्यांची घोषणा, दर महिन्याला मोफत वीज अन् बचतही होणार

धनंजय कुलकर्णी-उपसंपादक,दै.महाराष्ट्र सूर्योदय

कोट्यवधी मध्यमवर्गीय कुटुंबासाठी अर्थमंत्र्यांची घोषणा, दर महिन्याला मोफत वीज अन् बचतही होणार

नवी दिल्ली :- अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज आर्थिक वर्षी २०२४-२४ साठी देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यादरम्यान, सीतारामन यांनी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या तर काहींच्या हाती निराशा आली. आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्री म्हणाल्या की, प्रधानमंत्री सूर्योदय योजनेअंतर्गत एक कोटी घरांना दरमहा ३०० युनिट मोफत वीज मिळेल, ज्यामुळे ग्राहकांचे दरवर्षी १५,००० ते १८,००० रुपयांची बचत होईल, असा दावा केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ जानेवारी २०२४ रोजी या योजनेची घोषणा केली असून याअंतर्गत गरीब किंवा मध्यमवर्गीय लोकांच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यात येतील ज्यामुळे पगारदार वीज बिल भरण्याच्या त्रासातून मुक्त होतीलच पण अतिरिक्त विजेची बचतही होऊ शकेल. या योजनेंतर्गत २०२६ पर्यंत ४० हजार मेगावॅट वीज निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

योजनेची घोषणा करताना पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, ही योजना यशस्वी करण्यासाठी मोठी राष्ट्रीय मोहीम राबवण्याची गरज असून सरकारने २०१४ मध्ये सौभाग्य योजना सुरू केलेली ज्यामध्ये घरांच्या छतावर सोलर पॅनल बसवून २०२२ पर्यंत ४०,००० मेगावॅट वीज निर्मितीचे उद्दिष्ट ठेवलेले. परंतु सरकारी आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी डिसेंबर २०२३ पर्यंत या योजनेद्वारे केवळ ११,००० मेगावॅट वीजनिर्मिती होऊ शकली आणि आता या योजनेला चालना देण्यासाठी पंतप्रधान सर्वोदय योजना सुरू करण्यात आली आहे ज्याचा फायदा फक्त गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना होईल.

काय होईल लाभ
योजनेच्या लाभार्थ्यांना कमी वीज बिल येईल आणि वार्षिक १८,००० रुपयांपर्यंत बचत होईल. या योजनेसाठी पात्र लोक घराच्या छताचा वीज निर्मितीसाठी योग्य वापर करू शकतील. तसेच वीज ग्राहकांना सौर पॅनेल बसवण्यासाठी जमीन खरेदी करण्याची गरज भासणार नाही, ज्यामुळे कार्बन उत्सर्जन कमी होईल आणि देशात स्वच्छ ऊर्जेला चालना मिळेल.

सरकारी सेवेत कार्यरत नसलेल्या प्रत्येक भारतीय नागरिकाला प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचा लाभ मिळेल. तसेच लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न १.५ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे म्हणजे गरीब वर्ग, मध्यमवर्गीय आणि गरजू या योजनेसाठी पात्र ठरतील. अर्जदाराकडे आधार कार्ड, पत्त्याचा पुरावा, वीज बिल, बँक पासबुक, पासपोर्ट आकाराचा फोटो किंवा रेशन कार्ड यांसारखी कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

सूर्योदन योजनेसाठी अर्ज कसा करायचा?
प्रधानमंत्री सूर्योदय योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी https://solarrooftop.gov.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. यानंतर होम पेजवर Apply पर्याय निवडा. वापरकर्त्याने राज्य आणि जिल्ह्यानुसार सर्व माहिती द्यावी प्रविष्ट करावी आणि वीजबिल क्रमांक दिल्यानंतर वीज खर्चाची माहिती व मूलभूत माहिती, सोलर पॅनलचा तपशील प्रविष्ट करावा.

error: Content is protected !!