ब्रेकिंग न्युज
लोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी लिंबागणेश येथील फेव्हीस्टीक प्रकरणामुळे संवेदनशील मतदान केंद्राचा आयजी विरेंद् मिश्रा,एसपी नंदकुमार ठाकूर  यांच्याकडून आढावा जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजी

परंपरागत शेती सोडून नवीन शेती पद्धतीचा अवलंब जरबेरा फुलशेतीने दिले आर्थिक स्थैर्य-प्रियांका गणेश सावंत

धनंजय कुलकर्णी-उपसंपादक,दै.महाराष्ट्र सूर्योदय

परंपरागत शेती सोडून नवीन शेती पद्धतीचा अवलंब जरबेरा फुलशेतीने दिले आर्थिक स्थैर्य-प्रियांका गणेश सावंत

किल्ले धारूर (प्रतिनिधी):- राज्यातील कृषी, फलोत्‍पादन आणि संलग्‍न क्षेत्रामध्‍ये उल्‍लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच कृषी उत्‍पादन, उत्‍पन्‍नवाढीकरिता योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाच्या वतीने विविध कृषी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. या कृषी पुरस्कारांसाठी मराठवाड्यातून किल्लेधारूरच्या महिला शेतकरी प्रियांका गणेश सावंत यांनाही पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे त्याना हा पुरस्कार जाहीर होताच त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा व कौतूका चा वर्षाव होत आहे..

परंपरागत शेती सोडून नवीन शेती पद्धतीचा अवलंब जरबेरा फुलशेतीने दिले आर्थिक स्थैर्य-प्रियांका गणेश सावंत

परंपरागत शेती सोडून नवीन शेती पद्धतीचा अवलंब केल्यास अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि कल्पकता या माध्यमातून शेतीमध्ये नवनवीन प्रयोग होऊ शकतात. बीड जिल्ह्यातील किल्ले धारूर येथील अल्प भूधारक शेतकरी गणेश सावंत यांच्या पत्नी प्रियंका सावंत यांनी हे दाखवून दिले आहे. पारंपारिक पिक पद्धतीवर अवलंबून राहण्याऐवजी आधुनिक पद्धतीने शेती केल्यास शेतकी उत्पादनात निश्चित वाढ होते.

पॉली हाऊसमध्ये जरबेरा फुल पीक लागवडीच्या माध्यमातून प्रियंका यांनी या प्रगतशील शेतकऱ्याची शेती परिसरातील शेतकऱ्यांसाठी आदर्श शेती ठरत आहे.

नवनवीन प्रयोग व तंत्रज्ञान आत्मसात करुन आधुनिक व नाविण्यपूर्ण तंत्रज्ञानाचा आपल्या शेतात वापर करुन प्रियंका यांनी जरबेरा फुलांची शेती फुलविली आहे. यातून त्याना चांगले उत्पन्न मिळाले असून त्यांची शेती बघण्यासाठी दूरवरुन शेतकरी, शेती अभ्यासक, कृषी तज्ज्ञ तसेच नागरिक येत असतात.

जरबेरा फुलाची उत्पत्ती आफिका सारख्या देशात झाली आहे याचं उत्पादन घेताना हवामानाच्या अंदाजानुसार करावे लागते या सर्वांचा अंदाज घेत प्रियंका सावंत यांनी मराठवाड्यातील डोगर पट्ट्यात असणाऱ्या किल्ले धारूर येथे कोणतीही ऑर्डरघेतली तर तात्काळ फुलं देण्याची कोणतीही व्यवस्था नसताना विक्रमी उत्पादन करून राज्यात अनेक जिल्ह्याच्या ,व तालुक्याच्या ठिकाणी एसटी महामंडळाच्या पार्सल मार्फत तर कधी स्वतः त्यांचे पती गणेश सावंत मोटार सायकलवर जात आपल्या फुलांचा व्यापाऱ्यांना पुरवठा करत असतात .

पूर्वी पारंपारिक शेतीमध्ये फुलपिकांचे उत्पादन घेताना विशेष लाभ होत नव्हता. परंतु या प्रकल्पांतर्गत पॉली हाऊसची उभारणी केल्यानंतर प्रियंका सावंत यांनी पॉली हाऊसमध्ये जरबेरा फुल पिकाची लागवड केली. जरबेरा फुल पिकापासून त्यांना चांगले उत्पादन मिळून त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले आहे . शिवाय त्यांच्या जरबेरा शेतीच्या माध्यमातून अन्य मजूरांना रोजगारही प्राप्त झाला.

त्याच्या या उत्कृष्ट केलेया फुल शेतीची महाराष्ट्र शासनाने दखल घेत हा पुरस्कार त्यांना देण्याचा निर्णय घेतला . लवकरच या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.
पुरस्कार जाहीर झाल्या बद्दल कृषीमंत्री धनंजय मुंडे, आ. प्रकाशदादा सोंळके, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ, पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, जिल्हा कृषी अधीक्षक बाबासाहेब जेजूरकर, तालुका कृषी अधिकारी एस डी शिनगारे यांच्यासह कार्यालयीन सहकारी, मित्र परिवार, महिला वर्ग , नातेवाईक, पञकार व नागरीकानी कौतूक केले आहे

error: Content is protected !!