ब्रेकिंग न्युज
श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगीमराठा आरक्षणासाठी 32 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवनभाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

युवा नेते अशोक मोरे यांच्या पाठपुराव्याला यश ; रत्नापूर ग्रामपंचायतला कचरा संकलनासाठी इलेक्ट्रिक घंटागाडी रिक्षा

युवा नेते अशोक मोरे यांच्या पाठपुराव्याला यश ; रत्नापूर ग्रामपंचायतला कचरा संकलनासाठी इलेक्ट्रिक घंटागाडी रिक्षा

साईनाथ समूह महिला बचत गटाच्या महिलांना ७ लाख पन्नास हजार रुपयांच्या किंमतीचे व्यावसायिक साहित्य

जामखेड प्रतिनिधी;-रविवार दिनांक २५ फेब्रुवारी २०२४ रोजी जामखेड तालुक्यातील पिंपरखेड येथे खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून व सहकार्याने माहिला आर्थिक विकास महामंडळ योजने अंतर्गत बचत गटांना खासदार डॉ सुजय विखे यांच्या सौभाग्यवती धनश्री सुजय विखे पाटील यांच्या हस्ते साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी रत्नापूर येथील साईनाथ समूह महिला बचत गटाच्या महिलांना ७ लाख पन्नास हजार रुपयांच्या किंमतीचे व्यावसायिक साहित्य देण्यात आले. यावेळी भाजपा तालुका उपाध्यक्ष बापुराव ढवळे, रत्नापूर ग्रामपंचायत सदस्य अशोक मोरे , सरपंच राजेंद्र ओमासे, करण ढवळे,भाजपा महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा संजिवनी पाटील, अजित यादव, सुरेश खोसे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.तसेच रत्नापूर ग्रामपंचायतीला
कचरा संकलनासाठी इलेक्ट्रिक (वाहन) घंटागाडी रिक्षा मिळाली आहे. या घंटागाडी साठी ग्रामपंचायत सदस्य अशोक मोरे यांनी पाठपुरावा केला होता. सदर इलेक्ट्रिक वाहन घंटागाडी साठी अहमदनगर येथील भिस्तबाग महाल शेजारी मैदानात सुरू असलेल्या महासंस्कृती महोत्सवात उमेद अभियानांतर्गत बचत गटांना विविध कर्ज तसेच लाभाचे वाटप व जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण नाविन्यपूर्ण योजनेतंर्गत २०७ ग्रामपंचायतींना इलेक्ट्रिक घंटागाड्यांचे वितरण खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी रत्नापूर ग्रामपंचायतला इलेक्ट्रिक घंटागाडी विद्यमान सदस्य अशोक मोरे यांच्या कडे चावी देण्यात आली. यावेळी ग्रामसेवक सुनिल मोरे, पिंटू (वस्ताद) माने,विलास मोरे, मुबारक सय्यद , दत्तात्रय गिरी आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!