ब्रेकिंग न्युज
लोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी लिंबागणेश येथील फेव्हीस्टीक प्रकरणामुळे संवेदनशील मतदान केंद्राचा आयजी विरेंद् मिश्रा,एसपी नंदकुमार ठाकूर  यांच्याकडून आढावा जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजी

आष्टी-अंमळनेर ब्रॉडगेज मार्ग आणि प्रवासी रेल्वेचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला शुभारंभ

आष्टी-अंमळनेर ब्रॉडगेज मार्ग आणि प्रवासी रेल्वेचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला शुभारंभ

रेल्वेचे स्वप्न पूर्ण होत आहे, आता औद्योगिक विकासाला चालना देऊन युवकांना रोजगार देणार

खा. प्रितमताई मुंडे यांनी व्यक्त केला निर्धार

बीड. दि २८!;-बीड जिल्ह्यासाठी कामधेनू ठरणारा नगर-बीड-परळी रेल्वे प्रकल्प टप्प्याटप्प्याने पूर्णत्वाकडे जातो आहे, प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात आष्टी ते अंमळनेर या बत्तीस किलोमीटर ब्रॉडगेज मार्गाचा आणि प्रवाशी रेल्वेचा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आभासी पद्धतीने यवतमाळ येथून केला. तर अंमळनेर येथे हा कार्यक्रम खा. डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. बीडकरांचे रेल्वेचे स्वप्न पूर्णत्वाकडे जात आहे, हा प्रकल्प औद्योगिक दृष्ट्या अतिशय महत्वाचा असल्यामुळे पुढील काळात बीड जिल्ह्यात औद्योगिक विकासाची पायाभरणी करून जिल्ह्यातील तरुणांच्या हाताला रोजगार मिळवून देण्याचा आमचा मानस असल्याचा निर्धार याप्रसंगी खा. प्रितमताई मुंडे यांनी व्यक्त केला.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यातील विविध विकास कामांचा शुभारंभ यवतमाळ येथे पार पडला, या कार्यक्रमातंर्गत नगर-बीड-परळी रेल्वे मार्गातील आष्टी-अंमळनेर या बत्तीस किमी मार्गावर सुरु प्रवासी रेल्वेचा शुभारंभ प्रधानमंत्री मोदी यांनी व्हर्चूअली केला. तर अंमळनेर रेल्वे स्थानकावर खा. प्रितमताई मुंडे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून या कार्यक्रमात सहभाग घेतला. याप्रसंगी मंचावर भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, विजय गोल्हार, जयदत्त धस, अजय धोंडे, रेल्वेचे निरंजनकुमार डोहारे, चंद्रभूषण, दीपक आझाद,सर्जेराव तांदळे, देविदास नागरगोजे, सलीम जहाँगीर, सविता गोल्हार, माऊली जरांगे, रामदास बडे, सत्यसेन मिसाळ, सुधीर घुमरे, भागवत येवले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना खा. प्रितमताई मुंडे म्हणाल्या कि ‘लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांनी बीड जिल्ह्याला दिलेले वचन आम्ही पूर्ण करणार आहोत. या रेल्वे प्रकल्पाचे स्वप्न पूर्ण होत असताना जनतेला दिलेल्या शब्दाची पूर्तता होत असल्याचा आनंद असल्याचे त्या म्हणाल्या. रेल्वे प्रकल्पाच्या कामात अनेक अडथळे आले, राज्याचा निधी आवश्यकतेनुसार उपलब्ध झाला नाही,तरी देखील आम्ही सातत्यपूर्ण पाठपुरावा करून केंद्राचा निधी मिळवला आणि प्रकल्पाचे काम सुरु ठेवले.

सध्या प्रकल्पाचे काम गतीने सुरु आहे, लवकरच हा प्रकल्प पूर्ण होऊन परळी पासून मुंबईपर्यंत रेल्वे सुरु होईल. नगर पासून आष्टी आणि आष्टी पासून पाटोद्यापर्यंत रेल्वे आली आहे, काही महिन्यात बीड पर्यंत रेल्वे येणार असून जिल्ह्यातील प्रवासी लवकरच रेल्वेने बीडहुन मुंबईला जातील असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. आजचा दिवस स्वप्नपूर्तीचा असल्याने ज्यांनी ज्यांनी रेल्वेकरिता योगदान दिले आहे त्या सर्वांचे स्मरण आणि सन्मान होत आहे, अनेकांनी दिलेल्या योगदानातून आपल्या पुढील पिढ्यांना रेल्वेचा उपयोग होणार असल्याचे खा. प्रितमताई मुंडे यावेळी म्हणाल्या. याप्रसंगी उपस्थितांनी अमर रहे अमर रहे मुंडे साहेब अमर रहे’च्या जोरदार घोषणा देऊन लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांचे स्मरण केले.

••••

error: Content is protected !!