ब्रेकिंग न्युज
लोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी लिंबागणेश येथील फेव्हीस्टीक प्रकरणामुळे संवेदनशील मतदान केंद्राचा आयजी विरेंद् मिश्रा,एसपी नंदकुमार ठाकूर  यांच्याकडून आढावा जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजी

अखेर ‘माता व बालसंगोपन’ ला जिल्हा नियोजन मधुन ३ कोटी निधी मंजूर, जिल्हा प्रशासन सकारात्मक मात्र लोकप्रतिनिधी उदासीन:- डॉ.गणेश ढवळे

अखेर ‘माता व बालसंगोपन’ ला जिल्हा नियोजन मधुन ३ कोटी निधी मंजूर, जिल्हा प्रशासन सकारात्मक मात्र लोकप्रतिनिधी उदासीन:- डॉ.गणेश ढवळे

बीड:- बीड जिल्हा रुग्णालय आवारातील महिला व बाल रूग्णांसाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान मधुन २१ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेली २०० खाटांची ५ मजली ईमारत निधी अभावी फायर फिटींग व आक्सिजन पाइपलाइन कामे रखडल्याने वर्षभरापासून धुळखात पडुन आहे.याविषयी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती आधिकार कार्यकर्ता महासंघ डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी सहका-यांसमवेत आंदोलन करत पाठपुरावा केला होता.याची दखल घेत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक बडे आणि जिल्हाधिकारी दीपा मुधोळ -मुंडे यांच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे जिल्हा नियोजन समिती मधुन ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करत राखुन ठेवण्यात आला आहे.त्यामुळे लवकरच इमारतीचे रूग्णालयात रूपांतर होऊन गर्भवती महिला व बालरूग्णांची सोय होणार असल्याने हेळसांड थांबणार आहे.

सविस्तर माहितीस्तव

बीड जिल्हा रुग्णालयाची खाटांची क्षमता ३२० असली तरी आंतररुग्ण विभागात ५०० च्या जवळपास रूग्ण भरती असतात.शासनाने सर्व आरोग्य सेवा मोफत केल्याने बाह्यरुग्ण विभागात दररोज साधारण १५०० रूग्ण तपासणीसाठी येतात.जुनी रूग्णालयाची ईमारत जुनाट आणि अपुरी आहे.येथे सोनोग्राफी केंद्र असुन या केंद्राच्या समोरच्या बाजूला एक्स रे मशिन विभाग आहे.दोन्हीच्या मध्ये केवळ व्हरांडा असुन सोनोग्राफीसह एक्स रे करण्यासाठी येणाऱ्या रूग्णांची नियमितची संख्या ४०० च्या घरात आहे.यात महिलांची संख्या मोठ्या प्रमाणावर त्यामुळे गर्भवती महिलांना ताटकळत उभे रहावे लागते.गर्भवतींना याचा त्रास होतो.अपुरी जागा,अपुरे खाट व कोंदट वातावरण यामुळे गर्भवतींच्या आरोग्यावरही परीणाम होत आहे. जिल्हा रुग्णालयात महिला व बालसंगोपन केंद्राची इमारत बांधुन पुर्ण झाली असली तरी विद्युतीकरण व आक्सिजन पाइपलाइन अभावी ईमारत वर्षभरापासून वापरात नाही.नव्या इमारतीमध्ये महिलांसाठीचे सर्व विभाग व सोनोग्राफी केंद्र आदींसाठी सोय असुन त्यामुळे महिलांची सोय होणार असुन गर्भवती महिलांची हेळसांड थांबणार आहे.

जिल्हाप्रशासनाचा दृष्टीकोन सकारात्मक मात्र लोक प्रतिनिधींची उदासीन चिंताजनक :- डॉ.गणेश ढवळे

माता व बालसंगोपन ईमारत वापरात आणल्यास गर्भवती महिलांची हेळसांड थांबणार आहे यासाठी विद्युतीकरण व आक्सिजन पाइपलाइन अभावी धुळखात पडुन असलेली इमारत वापरात आणावी यासाठी वर्षभरापासून निवेदन तसेच आंदोलनाद्वारे पाठपुरावा करण्यात येत आहे.दरम्यान जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक बडे यांचा निधीसाठी आरोग्य विभाग, आरोग्य अभियान आयुक्तांकडे पाठपुरावा आणि जिल्हाधिकारी दीपा मुधोळ -मुंडे यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट देत नेमकी अडचण जाणुन घेत सकारात्मक दृष्टिकोनातुन मध्यम मार्ग काढत जिल्हा नियोजन मधुन ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करत राखून ठेवला आहे.जिल्हाप्रशासनाचा दृष्टीकोन सकारात्मक असताना लोकप्रतिनिधी मात्र या प्रश्नांकडे गांभीर्याने पहात नसुन त्यांची उदासीनता दिसून येत असुन याबद्दल जनसामान्यात नाराजीचा सुर दिसुन येत आहे.

error: Content is protected !!