ब्रेकिंग न्युज
आ.संदीप क्षीरसागरांचा बजरंग सोनवणेंसोबत झंझावाती दौराप्रा.सुरेश नवले मित्रमंडळाच्या वतीने आयोजीत  कार्यकर्ता संवाद मेळाव्यास हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे सुपेकर, उबाळे, जाधव, घोडके, शेळके, चव्हाण यांचे आवाहनपंकजाताई मुंडे यांची नाळवंडीत भर पावसात झाली वादळी सभागाव उजळवणारे सौर ऊर्जेचे खांब अंधारात; गावपुढा-यांच्या खिशात पैशाचा प्रकाश :- डॉ.गणेश ढवळेहे सरकार काळ्या आईशी इमान राखणाऱया शेतकऱ्याचे नाही! शेवगावातील सभेत शरद पवार यांचा हल्लाबोलदहिगांव -ने परिसरातील देवळाणेत ५५ मेंंढ्या मुत्युमुखीपोकलेन मशिनमुळे पारंपरिक पद्धतीने क्रेनच्या सहाय्याने विहिर खोदकाम कामाला घरघर :-  डॉ.गणेश ढवळेजातीपातीचे पाहण्यापेक्षा, जिल्ह्याच्या मातीला विकासाचे वैभव द्या  –  पंकजाताई मुंडेमतदानाचा टक्का वाढवण्यासाठी ऐतिहासिक सायक्लोथाॅन सायकल व मोटरसायकल रॅली वडवणी शहरातून संपन्न…सारोळा शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन निमित्त रेकॉर्ड ब्रेक ग्रामस्थांचे तब्बल एक लाख वीस हजार रुपयांचे रोख स्वरूपात बक्षिस..!

माऊली महाविद्यालयाच्या मतदार जागृती उपक्रमाची राज्य निवडणूक आयोगाकडून दखल, उत्कृष्ट महाविद्यालय, उत्कृष्ट नोडल अधिकारी पुरस्काराने सन्मानित

सोलापूर संपादक- महेश पवार

प्रतिनिधी – संतोष विभूते

मतदार जागृती आणि नोंदणीसाठी गेल्या वर्षी वडाळा येथील माऊली महाविद्यालयाने राबविलेल्या उपक्रमाची दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने महाविद्यालयाला उत्कृष्ठ महाविद्यालय, उत्कृष्ठ नोडल अधिकारी या पुरस्काराने सन्मानित केले आहे.
राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे, जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी हा पुरस्कार वितरण कार्यक्रम झाला.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिरीष भोसले, उपक्रम कालावधीतील प्रभारी प्राचार्य डॉ.दत्तात्रय हरवाळकर, नोडल अधिकारी प्रा.डॉ.प्रमोद पाटील यावेळी उपस्थित होते.
राज्य मुख्य निवडणूक आयुक्त देशपांडे म्हणाले, “मतदारांमध्ये मतदान व लोकशाहीविषयी जागृती होणे गरजेचे आहे.हे काम महाविद्यालयाचे विद्यार्थी उत्कृष्ठपणे करु शकतात. तरुणांचा मतदानाचा टक्का वाढविण्यासाठीही महाविद्यालयांनी जागृती करण्याची आवश्यकता आहे.त्यासाठी महाविद्यालयांमधून सातत्याने मतदार जागृतीचे उपक्रम राबविण्यात यावेत.मतदानाच्या दिवशी वृध्द मतदारांना मतदान केंद्रावर नेणे,त्यांची काळजी घेणे,हे काम देखील लोकशाहीची सेवा या भूमिकेतून निःपक्षपातीपणे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी करावे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भोसले म्हणाले, मुळातच संस्थेचे मार्गदर्शक व जिल्ह्याचे ज्मयेष्ठ व ऋषीतुल्य नेते काकासाहेब साठे, संस्थेचे अध्यक्ष व वडाळा गावचे सरपंच जितेंद्रबाबा साठे यांचे मतदार जागृतीसाठी सातत्याने प्रोत्साहन असते.माऊली महाविद्यालयाच्या माध्यमातून माजी प्रभारी प्राचार्य डॉ. दत्तात्रय हरवाळकर, राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून प्रा.डॉ.विकास शिंदे, प्रा.डॉ.प्रमोद पाटील यांच्यासह सर्व प्राध्यापक, विद्यार्थ्यांनी मतदार जागृतीचे चांगले उपक्रम राबविले.यापुढेही महाविद्यालयातून असे उपक्रम सातत्याने राबविण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू.

error: Content is protected !!