ब्रेकिंग न्युज
श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगीमराठा आरक्षणासाठी 32 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवनभाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

दोन महिन्यापासून नगरपालिकेला इंजिनिअर नाही बांधकाम मजूर अनुभव प्रमाणपत्र घेण्यासाठी मारतात चकरा

दोन महिन्यापासून नगरपालिकेला इंजिनिअर नाही
बांधकाम मजूर अनुभव प्रमाणपत्र घेण्यासाठी मारतात चकरा
गेवराई प्रतिनिधी;- गेवराई नगर परिषद चे इंजिनियर बदली होऊन गेल्यापासून गेवराई नगरपालिकेला मागील दोन महिन्यापासून कायमस्वरूपी इंजिनियर नसल्याने बांधकाम मजुरांना अनुभव प्रमाणपत्र मिळत नाही प्रमाणपत्र देण्यासाठी इंजिनिअर नसल्याने त्यांना नगरपरिषद मध्ये दररोज चकरा माराव्या लागत आहेत.
             गेवराई नगर परिषदला कायमस्वरूपी इंजिनियर मागिल दोन महिन्यापासून नाही तरीही विकास कामे होतात कशी ? ही कामे करण्यासाठी तात्पुरता इंजिनिअरचा चार्ज दुसऱ्याकडे देऊन केली जातात का ? प्रायव्हेट इंजिनिअर कडून केली जातात ? परंतु कामे होतात मग बांधकाम करणाऱ्या गोरगरीब मजुरांन हतावरची कामे सोडून अनुभव प्रमाणपत्रासाठी नगर परिषद मध्ये चकरा मारत असुन त्यांनाच का वेठीस धरले जाते. त्यांची कामे करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात का होईना इंजिनियर का उपलब्ध होत नाही असा सवाल जनता करत असून त्या गोरगरीब कामगारांची कामे करण्यातसाठी इंजिनीयरचा पदभार दुसऱ्याकडे देऊन त्यांची होणारी हेळसांड थांबवावी अशी मागणी देखील जनतेतून होत आहे
चौकट
बांधकाम मजुरांना प्रमाणपत्र देण्यासाठी चर्चा करून पर्यायी व्यवस्था केली जाईल जेणेकरून त्यांचे काम आडणार नाही व त्यांना वारंवार नगरपरिषद मध्ये चकरा मारण्याची वेळ सुद्धा येणार नाही इंजिनिअरची बदली झाल्यामुळे अडचण निर्माण झाली होती परंतु लवकरात लवकर यावर तोडगा निघेल असे नवनिर्वाचित गेवराई नगर परिषदचे सिओ विक्रम मांडूळके मनाले.
error: Content is protected !!