ब्रेकिंग न्युज
लोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी लिंबागणेश येथील फेव्हीस्टीक प्रकरणामुळे संवेदनशील मतदान केंद्राचा आयजी विरेंद् मिश्रा,एसपी नंदकुमार ठाकूर  यांच्याकडून आढावा जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजी

*साबला येथे जागतिक “महिलादिन” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.* *महिलांनी स्वावलंबी बनण्याचा प्रयत्न कराव – सौ.जनाबाई काकडे, सरपंच, साबला.*

केज ! प्रतिनिधी

केज तालुक्यातील मौजे साबला येथे ” जागतिक महिलादिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सरपंच सौ . जनाबाई काकडे या होत्या तर प्रमुख पाहुण्या म्हणून माजी सरपंच सौ . कलावतीताई नाईकनवरे , डॉ . प्रियदर्शनी गायकवाड लातूर , आंगणावाडी शिक्षिका सौ . सुनंदाताई काकडे, आरोग्य सेविका सौ.वर्षाताई काकडे या होत्या तर या कार्यक्रमाची सुरुवात ही राष्ट्रमाता जिजाऊ मॉसाहेब , क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले .स्व . सौ.विमलताई मुंदडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आली. जागतिक “महिलादिन ” या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व महिलांचा सत्कार या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सरपंच सौ . जनाबाई काकडे हस्ते करण्यात आला . यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सरपंच सौ . जनाबाई काकडे यांनी जगतिक महिला दिनानिमित्त महिलांना मार्गदर्शन करतांना असे म्हटले की या जागतिक स्पर्धेत टिकायचे असेल तर महिलांनी स्वत: चे अस्तित्व निर्माण केले पाहिजे , तसेच सर्व महिलांनी स्वावलंबी बनले पाहिजे , एखादा छोटा मोठा उद्योग निर्माण करण्याचा प्रयत्न करावा त्यांना महिला बचत गटाच्या माध्यमातून सहकार्य करण्याचे काम केले जाईल असे आश्वासनही यावेळी अध्यक्षांनी दिले . महिलांनी शिक्षणाकडे जास्त लक्ष द्यावे . तसेच आपल्या गावात बालविवाह होणार नाही याची गावातील प्रत्येक महिलांनी तसेच सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी अशी विनंती यावेळी करण्यात आली . यावेळी गावातील उपस्थित महिला सौ . काशिबाई राऊत , सौ . पुजाताई पांचाळ , सौ . भाग्यश्री मुळे , सौ . अनिताताई शिंदे , सौ . सिताताई काकडे , सौ . राधाताई काकडे , सौ . इंद्रायणी काकडे , सौ . अनिताताई काकडे , सौ . कांताबाई काकडे , सौ . गवळबाई परळकर , सौ . अल्काबाई काकडे तसेच या कार्यक्रमासाठी मेोजे धर्माळा येथील महिला उपस्थित होत्या त्यांचाही या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सरपंच सौ . जनाबाई काकडे यांच्या हस्ते त्यांचाही सत्कार करण्यात आला . हा जागतिक महिलादिन कार्यक्रम यशस्वी करण्याचे काम ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर पांचाळ , राहुल मुळे , माऊली नाईकनवरे यांनी केले तर या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आदर्श शिक्षक नरहरी काकडे यांनी केले तर आभार ग्रामविकास अधिकारी पंचायत समिती केज धनराज सोनवण यांनी मानले .

error: Content is protected !!