ब्रेकिंग न्युज
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना वादळाचा बसणार तडाखा; ताशी 40 KM वेगाने वाहणार वारेलोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी लिंबागणेश येथील फेव्हीस्टीक प्रकरणामुळे संवेदनशील मतदान केंद्राचा आयजी विरेंद् मिश्रा,एसपी नंदकुमार ठाकूर  यांच्याकडून आढावा जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !

सत्तापदावर असताना बीड जिल्ह्याच्या झोळीत कोटीने दान टाकणार्‍या, पंकजाताईचं आगमन लक्ष्मीच्या पावली आज होणार…               

सत्तापदावर असताना बीड जिल्ह्याच्या झोळीत कोटीने दान टाकणार्‍या, पंकजाताईचं आगमन लक्ष्मीच्या पावली आज होणार…

स्वागतासाठी उपस्थित रहा- राजेंद्र मस्के, प्रवक्ते राम कुलकर्णींचे आवाहन..!

बीड(प्रतिनिधी)-बीड लोकसभा मतदारसंघातुन महायुतीची उमेदवारी जाहिर झाल्यानंतर भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई गोपीनाथ मुंडे प्रथमच आज जिल्हा सीमेवर पाऊल टाकणार आहेत. विकास हीच ओळख असलेल्या नेतृत्वाने सत्तापदावर असताना बीड जिल्ह्यातील शेतकर्‍यांना 1200 कोटीचा विमा मिळवुन दिला, 2515 ची ओळख त्यातुन ग्रामीण रस्ते पुर्ण केले. प्रितमताईच्या माध्यमातुन 11 राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती आणि सर्वांचे स्वप्न असलेल्या नगर-बीड-परळी रेल्वेमार्गाचा प्रश्न सोडवुन दाखवला. जलसंधारणाच्या माध्यमातुन दुष्काळी भागात सिंचन फुलवले. पालकमंत्री म्हणुन काम करताना वंचित, उपेक्षित, कष्टकरी, शेतकरी वर्गाला न्याय मिळवुन देताना माझा जिल्हा-माझी माणसं हे सुत्र डोळ्यासमोर ठेवत ज्यांनी पावलोपावली कोट्यावधीचा निधी जिल्ह्यात आणला, त्याच पंकजाताई लक्ष्मीच्या पावली पुन्हा आपल्या कर्मभुमीत येत असुन दिल्ली स्वारीवर निघालेल्या लाडक्या लेकीचे स्वागत करण्यासाठी जिल्हाभरातील पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी तथा महायुतीच्या प्रमुख पदाधिकार्‍यांनी उपस्थित रहावे असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के आणि प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केले.
प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, आज 22 रोजी आमच्या लोकनेत्या पंकजाताई बीड जिल्ह्यात येत असुन लोकसभेची उमेदवारी जाहिर झाल्यानंतर प्रथमच येत असुन धामणगावच्या जिल्हा सीमेवर त्यांचं तीर्थक्षेत्र मोहटादेवी मार्गे आगमन होणार आहे. जिल्ह्याच्या वतीने भव्य स्वागत होत असुन कडा, आष्टी येथेही स्वागताची जोरदार तयार करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तीर्थक्षेत्र गहिनीनाथ गड, सावरगाव घाट येथील भगवान गडावर जावुन राष्ट्रसंत भगवानबाबाचे आशिर्वाद घेणार असल्याचे त्यांनी म्हटले. पंकजाताईंना उमेदवारी जाहिर झाल्यानंतर बीड जिल्ह्यातील सामान्य माणसाला फार मोठा आनंद झाला. त्याचं कारण हे नेतृत्व पालकमंत्री असताना काय करू शकतं?हे जिल्हावासियांनी पाहिलं. तब्बल पाच वर्षे जिल्ह्याचा सांभाळ करताना मातृत्वाच्या भुमिकेत सबका साथ -सबका विकास यातुन त्यांनी एक एक क्षण पावलोपावली जिल्हा विकासाच्या प्रक्रियेसाठी कामी लावला. त्यांच्या काळात सतत पाच वर्षे शेतकर्‍यांना नाही म्हटलं तरी 1200 कोटीच्या आसपास विमा मिळाला. 2515च्या माध्यमातुन ग्रामीण भागातील रस्ते पुर्ण झाले. मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत त्यांनी गाव तिथे मजबुत रस्ते केले. भगिनी खा.डॉ.प्रितमाताईच्या माध्यमातुन वर्षानुवर्षाचे जे स्वप्न रेल्वेचे होते ते पुर्ण करण्यासाठी जीवाचं रान करत अखेर रेल्वे आणुन दाखविली. या जिल्ह्यात 11 राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यातुन घालवले. ज्यामुळे 50000 अधिक कोटीपेक्षा जास्त रूपायाचे खर्च यावर झाला. तीर्थक्षेत्र असो किंवा शहरी आणि ग्रामीण भागातील इतर विकासाचे प्रश्न असोत असं एक गाव नाही जिथे पंकजाताईच्या विकास योजना राबवल्या नाहीत. पालकमंत्री म्हणुन काम करताना सर्वांना सोबत घेवुन त्यांनी काम केलं. सुडाचं आणि द्वेषाचे राजकारण विरोधकांच्या बाबतीतही केलं नाही. त्यामुळेच लोकसभेसाठी थेट पंकजाताईसाठी आपल्याला मतदान करायचं ही संधी आल्याने बीड जिल्ह्यातील तमाम मतदार आणि सामान्य जनता उत्साही, आनंदी दिसत आहे. त्यांच्या विजयासाठी महायुतीचे सर्व घटक तयारीला लागलेले दिसतात. वैचारिक, सुसंस्कृत महिला नेतृत्व केंद्रात गेल्यानंतर पुन्हा एकदा जिल्ह्याचं निश्चित भाग्य उजळेल अशा प्रतिक्रिया सुजाण नागरिक बोलुन दाखवितात. स्व.गोपीनाथराव मुंडे यांचा वारसा जोपासण्यासाठी लक्ष्मीच्या पावली पुन्हा जिल्ह्याची लाडकी लेक आष्टीच्या सीमेवर पाऊल टाकत असुन जिल्हाभरातील पक्षाचे सर्व प्रमुख कार्यकर्ते, महायुती घटक पक्षातील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी तथा सामान्य जनतेने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के तथा प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केले.

error: Content is protected !!