ब्रेकिंग न्युज
लोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी लिंबागणेश येथील फेव्हीस्टीक प्रकरणामुळे संवेदनशील मतदान केंद्राचा आयजी विरेंद् मिश्रा,एसपी नंदकुमार ठाकूर  यांच्याकडून आढावा जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजी

प्रत्येकांनी आपल्या अवतीभोवती असलेले झाडे जोपासने जलसंवर्धनासाठीचा उत्तम पर्याय- संचालिका डॉ.आदिती सारडा

प्रत्येकांनी आपल्या अवतीभोवती असलेले झाडे जोपासने जलसंवर्धनासाठीचा उत्तम पर्याय- संचालिका डॉ.आदिती सारडा
प्रतिनिधी । बीड;-संपूर्ण जग हे पाण्यावर अवलंबून आहे. पाण्याची बचत आणि पाण्याचा योग्य तो वापर प्रत्येकांनी केलाच पाहीजे. पाणी निर्मितीसाठी प्रत्येकाने योग्य ती ठोस पावले उचलणे आवश्यक आहे. बदलते हवामान पाहता जास्तीत जास्त झाडांची संख्या आपल्या अवतीभोवती वाढवणे आणि त्यांची जोपासना करणे हाच एक जलसंवर्धनासाठीचा उत्तम पर्याय ठरणार आहे. असल्याचे आदित्य शिक्षण संस्थेच्या संचालिका तथा वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणीच्या कार्यकारी सदस्या डॉ. आदिती सारडा म्हणाल्या.
आदित्य कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय आणि आदित्य अन्न तंत्र महाविद्यालय बीड येथे जागतिक जल दिवस आदित्य शिक्षण संस्थेचे मुख्य प्रवर्तक मा. सुभाषचंद्र सारडा यांच्या ठरवून दिलेल्या उद्धिष्टाप्रमाणे व डॉ. आदिती सारडा यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्य अमोल सानप, प्राचार्य श्याम भुतडा यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलतांना सारडा म्हणाल्या की, भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी तसेच वृक्ष लागवडीसाठी योग्य ते उपक्रम आदित्य शिक्षण संस्था येत्या काळात राबवेल. असे  आश्वासन डॉ. आदिती सारडा यांनी विद्यार्थ्यांना दिले. जल संवर्धन जनजागृतीसाठी आदित्य कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय,  आदित्य अन्न तंत्र महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थींनी  रॅली काढत पाण्याचे महत्व पटऊन दिले.
प्राचार्य श्याम भुतडा म्हणाले की, पृथ्वीच्या भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे. दक्षिण आफ्रिकेची राजधानी केपटाऊन हे शहर जगातील पहिले पाणी नसलेले शहर बनलेले आहे. संपूर्ण भारत देशामध्ये साधारण 63% इतका तरुण वर्ग असून सध्याचा तरुण वर्ग हा जल संवर्धनासाठी उपयुक्त ठरू शकतो. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या वाढदिवशी कमीत कमी एक तरी झाड लावावे असे अवाहन भुतडा यांनी केले. एक कडुनिंबाचे झाड दहा हजार लिटर तर एक वटवृक्षाचे झाड पूर्ण सीझनमध्ये साधारणतः एक कोटी लिटर पाणी जमिनीमध्ये घेऊन जाऊ शकते.
error: Content is protected !!