ब्रेकिंग न्युज
पोकलेन मशिनमुळे पारंपरिक पद्धतीने क्रेनच्या सहाय्याने विहिर खोदकाम कामाला घरघर :-  डॉ.गणेश ढवळेजातीपातीचे पाहण्यापेक्षा, जिल्ह्याच्या मातीला विकासाचे वैभव द्या  –  पंकजाताई मुंडेमतदानाचा टक्का वाढवण्यासाठी ऐतिहासिक सायक्लोथाॅन सायकल व मोटरसायकल रॅली वडवणी शहरातून संपन्न…सारोळा शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन निमित्त रेकॉर्ड ब्रेक ग्रामस्थांचे तब्बल एक लाख वीस हजार रुपयांचे रोख स्वरूपात बक्षिस..!सारोळा शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन निमित्त रेकॉर्ड ब्रेक ग्रामस्थांचे तब्बल एक लाख वीस हजार रुपयांचे रोख स्वरूपात बक्षिस..!शिक्षण विभागाला बदनाम करणाऱ्या विजय जाधव यांचा शिक्षक संघटनांकडून जाहीर निषेधवारकरी संत विचार महापरिषद महाराष्ट्र बहुउद्देशीय संघटनेची स्थापनापत्रकारांचा तोतया पत्रकार संभावना करणाऱ्या विजय जाधव या शिक्षकाचा जामखेड तालुका पत्रकारांकडून जाहीर निषेध, गुन्हा नोंद करण्याची मागणी !तरूण पिढीने मुलांच्या शिक्षणाकडे अधिक लक्ष द्यावे – गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवेचौंडी येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

दिवंगत लोकनेते विनायकराव मेटे यांच्या पत्नी तथा शिवसंग्रामच्या सर्वेसर्वा डॉक्टर ज्योती मेटे उतरणार लोकसभेच्या रिंगणात !

 

धनंजय कुलकर्णी-उपसंपाद्क ,दै.महाराष्ट्र सूर्योदय

दिवंगत लोकनेते विनायकराव मेटे यांच्या पत्नी तथा शिवसंग्रामच्या सर्वेसर्वा डॉक्टर ज्योती मेटे उतरणार लोकसभेच्या रिंगणात !

बीड (प्रतिनिधी):-. ज्योती मेटे यांनी अप्पर सहकार विभागाच्या सहनिबंधकपदाचा राजीनामा देत स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. संबंधित विभागाने ज्योती मेटे यांचा राजीनामा स्वीकारल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

यामुळे ज्योती मेटे यांचा लोकसभा निवडणूक लढवण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून त्यांच्या बीड लोकसभा निवडणूक लढवण्याच्या शक्यतेवर शिक्कामोर्तब झाला आहे. यातच ते शरद पवार गटाकडून लोकसभा निवडणूक लढू शकतात अशी चर्चा आहे. मात्र या चर्चेला अद्याप पूर्णविराम मिळाले नाही. एक चर्चा अशी आहे की, त्या मनोज जरांगे पाटलांचा अपक्ष झेंडा हाती घेऊ शकतात. मात्र ही अद्यापही फक्त चर्चाच आहे.

दरम्यान, राजीनामा देण्याआधी माध्यमांशी संवाद साधताना लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत ज्योती मेटे म्हणाल्या की, ”गेल्या अनेक दिवसांची पोकळी भरून काढण्यासाठी आता मी ठरवलं आहे. त्यामुळे मी आता यापुढे पूर्णपणे राजकीय काम करणार आहे.” यावेळी ज्योती मेटे शिवसंग्राम भवन येथे आल्या असता, तिथे उपथित कार्यकर्त्यांनी ‘बिड का खासदार कैसा हो, ज्योती मेटे जैसा हो’, असं म्हणत घोषणाबाजी देखील केली.

error: Content is protected !!