ब्रेकिंग न्युज
आमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजीआज12 मे जागतिक परिचारिका दिनानिमित्तग्रामदैवत सालशिदबाबा यात्रा उत्सव उद्या दिनांक १२/०५/२०२४ वार रविवार यात्रेचे आयोजनआज कडा येथील उपमुख्यमंत्री अजित पवार व छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जाहीर सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.-आ. बाळासाहेब आजबे यांचे आवाहनजामखेड येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरीरोहितला राज्याचा नेता होण्याची घाई आणि लंकेंना लोकसभेत जाण्याची घाई – उपमुख्यमंत्री अजित पवार

कोल्हारवाडी येथे विभागीय कुस्तीमध्ये अंतिम विजयाचे मानकरी सुरेश सारूक.

कोल्हारवाडी येथे विभागीय कुस्तीमध्ये अंतिम विजयाचे मानकरी सुरेश सारूक.
दोन किलो चांदीची गदा व 11 हजार रुपये रोख देऊन सन्मान.
नांदुर घाट प्रतिनिधी;-केज तालुक्यातील नांदूर घाट सर्कल अंतर्गत असलेले खाडेवाडी येथील वस्ताद सुरेश बाबुराव सारूक यांनी कोल्हारवाडी येथे आयोजित असलेल्या धर्मवीर प्रतिष्ठान कुस्ती स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये अंतिम लढतीमध्ये सुरेश सारूक यांनी अत्यंत चुरशीची लढत देऊन विजय संपादित केला. या मध्ये त्यांना दोन किलो चांदीची गदा व 11 हजार रुपये रोख बक्षीस बाजीराव चव्हाण यांच्याकडून देण्यात आले. अत्यंत छोट्याशा गावांमधून शेतकऱ्याच्या कुटुंबातून येऊन आपल्या कलेला महत्त्व देऊन कुस्तीचा नाद जोपासत असताना त्यांच्या या कामगिरीबद्दल सर्व स्तरातून कौतुक होताना दिसत आहे. त्यांचा हा विजय झाल्याबद्दल नांदुर घाट व परिसरातील जनतेच्या वतीने भव्य दिव्य सत्कार करण्यात आला. यावेळी या सत्काराचे आयोजन ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीकांतराजे जाधव. प्राध्यापक सतीशजी मोराळे. बाबुराव पाटील. अमोल जाधव. प्रदीप जाधव. दिलीपराव मुंडे. रोहित हंगे. बाळासाहेब जाधव. दत्ता जाधव. अनिल खाडे. महादेव सारूक. संभाजी सारूक. दत्ता खाडे. बाबुराव खाडे. युवराज बोबडे. सुशांत खाडे यांच्यासह नंदिग्राम विद्यालयाचे मुख्याध्यापक शिंदे सर .सर्जेराव खाडे. सर धुमाळ सर व सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी सर्वांच्या वतीने शुभेच्छा देखील देण्यात आल्या.
error: Content is protected !!