ब्रेकिंग न्युज
पोकलेन मशिनमुळे पारंपरिक पद्धतीने क्रेनच्या सहाय्याने विहिर खोदकाम कामाला घरघर :-  डॉ.गणेश ढवळेजातीपातीचे पाहण्यापेक्षा, जिल्ह्याच्या मातीला विकासाचे वैभव द्या  –  पंकजाताई मुंडेमतदानाचा टक्का वाढवण्यासाठी ऐतिहासिक सायक्लोथाॅन सायकल व मोटरसायकल रॅली वडवणी शहरातून संपन्न…सारोळा शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन निमित्त रेकॉर्ड ब्रेक ग्रामस्थांचे तब्बल एक लाख वीस हजार रुपयांचे रोख स्वरूपात बक्षिस..!सारोळा शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन निमित्त रेकॉर्ड ब्रेक ग्रामस्थांचे तब्बल एक लाख वीस हजार रुपयांचे रोख स्वरूपात बक्षिस..!शिक्षण विभागाला बदनाम करणाऱ्या विजय जाधव यांचा शिक्षक संघटनांकडून जाहीर निषेधवारकरी संत विचार महापरिषद महाराष्ट्र बहुउद्देशीय संघटनेची स्थापनापत्रकारांचा तोतया पत्रकार संभावना करणाऱ्या विजय जाधव या शिक्षकाचा जामखेड तालुका पत्रकारांकडून जाहीर निषेध, गुन्हा नोंद करण्याची मागणी !तरूण पिढीने मुलांच्या शिक्षणाकडे अधिक लक्ष द्यावे – गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवेचौंडी येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता !

धनंजय कुलकर्णी-उपसंपादक,दै.महाराष्ट्र सूर्योदय

पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता !

मुंबई (प्रतिनिधी ):-: पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. भाजपने संजय राऊतांची निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. ‘नरेंद्र मोदी का जहाँ जन्म हुआ है, उसी के पास औरंगजेब पैदा हुआ था, इसलिए औरंगजेबकी मानसिकता के साथ हमारे उपर हमला होता है’, असं वक्तव्य संजय राऊतांनी बुलढाणा जिल्ह्यात उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये केलं होतं. या भाषणाची सीडी भाजपने निवडणूक आयोगाकडे सादर केली आहे. संजय राऊतांचं वक्तव्य म्हणजे जनप्रतिनिधी कायदा 1951 च्या कलम 123 (4) चे आणि आदर्श आचरसंहितेचं उल्लंघन असल्याचं भाजपने त्यांच्या तक्रारीत म्हटलं आहे.

कलम 125 दोन समुदायात द्वेषाची भावना तयार करणे, यात 3 वर्षांचा कारावास आहे. तसंच भादंविच्या 153 अ, 153 ब आणि 499 या कलमांचाही तक्रारीत उल्लेख करण्यात आला आहे. सुब्रमण्यम स्वामी विरुद्ध केंद्र सरकार, दिनकरन विरुद्ध सीटी पब्लिक, अभिरामसिंग विरुद्ध सीडी कोम्माचेन या सुप्रीम कोर्टाच्या खटल्यांच्या निकालांचा दाखलाही तक्रारीत जोडण्यात आला आहे. तसंच उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये हे बोलल्याने तेही या गुन्ह्यातील भागीदार असल्याचा आरोप भाजपने केला आहे.

संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंनी तात्काळ पंतप्रधानांची माफी मागावी, असे निर्देश द्यावेत. तसंच संजय राऊत यांच्यावर तात्काळ एफआयआर दाखल करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी भाजपने निवडणूक आयोगाकडे केली आहे. या पत्रावर अश्विनी वैष्णव, ओम पाठक, विनोद तावडे आणि संजय मयुख या भाजप नेत्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

error: Content is protected !!