ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

अंगावर वीज पडल्याने शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू

अंगावर वीज पडल्याने शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू

गेवराई तालुक्यातील पाथरवाला बुद्रुक येथील घटना

गुळज प्रतिनिधी;- गेवराई तालुक्यातील पाथरवाला बुद्रुक (बनगर वस्ती) येथे अंगावर विज पडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची, दुर्दैवी घटना घडली आहे. सदर घटनेने परिसरामध्ये मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

गेल्या दोन दिवसापासून बीड जिल्ह्यात सर्वत्र ढगाळलेले वातावरण निर्माण झाले आहे. तसेच काही भागात विजांचा गडगडाट आणि अवकाळी पाऊस हजेरी लावताना दिसत आहे. अशा परिस्थितीत बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील पाथरवाला बुद्रुक येथे बनगर वस्ती शिवारात, श्रीराम भाऊसाहेब ठोंबरे हा सतरा वर्षीय विद्यार्थी, उसाच्या शेताला पाणी देत असताना, वीज अंगावर पडून सदरील विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सदर घटनेची माहिती चकलांबा पोलिसांना मिळतात पोह अमोल इंगळे आणि हे पो कॉ विनोद सुरवसे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केले तसेच या परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

error: Content is protected !!