ब्रेकिंग न्युज
लोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी लिंबागणेश येथील फेव्हीस्टीक प्रकरणामुळे संवेदनशील मतदान केंद्राचा आयजी विरेंद् मिश्रा,एसपी नंदकुमार ठाकूर  यांच्याकडून आढावा जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजी

तलवारीने दहशत माजवणाऱ्यास अटक

[  अंमळनेर  ] प्रतिनिधी .दि. ४ काल सायंकाळी सहाच्या सुमारास  कापशी येथील सरपंच बाळासाहेब गर्जे व इतर ग्रामस्थांनी अंमळनेर पोलीस स्टेशनला फोन करून ठाणे प्रभारी सपकाळ साहेब यांना सांगितले की मौजे कापसी तालुका आष्टी येथे अंकुश मोहन मोरे वय 38 वर्ष राहणार कापसी तालुका आष्टी जिल्हा बीड हा गावांमध्ये तलवार घेऊन फिरत असून तो गावातील लोकांना दमदाटी करून दहशत माजवत आहे . अशी माहिती मिळाल्याने ठाणे प्रभारी सपोनी सपकाळ सोबत पोलीस कॉन्स्टेबल योगेश बहिरवाळ श्याम खाडे व सुधाकर जायभाय चालक विठ्ठल वारे असे कापशी येथे जाऊन तलवारीसह अंकुश मोरे यास कापसी फाटा येथे पाठलाग करून पकडले व पोलीस ठाणे अंमळनेर येथे आणले . अंकुश मोरे हा मागील दोन वर्षापासून अंमळनेर पोलीस ठाण्यातील गंभीर गुन्ह्यामध्ये फरार होता. कापसी परिसरात तलवारीने दहशत माजवल्यामुळे परिसरातील सामान्य  लोकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झाले .

आचारसंहितेमध्ये असे गुन्हेगाराकडून  गुन्हे होणे  म्हणजे ही बाब मोठी आहे . कदाचित यामध्ये कोणी जखमी झाले असते . पण अंमळनेर पोलिसांच्या  सतर्कतेमुळे फरार होणाऱ्या आरोपीस  पाठलाग करून अटक केले . पोलिसांची कौतुकास पद कामगिरी पहावयास मिळाली .  काल त्याच्यावर शस्त्र अधिनियमानुसार नवीन गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे. तसेच मागील फरार गुन्ह्यांमध्ये देखील अटक करण्यात येणार आहे त्यास आज न्यायालयीन कोठडी कामी कोर्ट आष्टी येथे हजर केले आहे. पुढील तपास सपोनी सपकाळ साहेब यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मंजुळे पोलीस नाईक गरजे पोलीस कॉन्स्टेबल बहिरवाळ खाडे जायभाय हे करीत आहेत.

error: Content is protected !!