ब्रेकिंग न्युज
आज आष्टी तालुक्यातील वाघळुज येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत संवाद बैठककाँग्रेसने ५० वर्ष गरीबी हटवण्याचे खोटे आश्वासन दिले – नरेंद्र मोदीजामखेड येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ९ मे रोजी सभाकाँग्रेसने ५० वर्ष गरीबी हटवण्याचे खोटे आश्वासन दिले – नरेंद्र मोदीआ. राम शिंदे यांची डोणगाव येथे कॉर्नर सभा पुन्हा एकदा डॉ सुजय विखे यांना निवडून आणायचे – आ.प्रा.राम शिंदेजगदज्योती महात्मा बसवेश्वर जयंती च्या अध्यक्ष पदी अजय रुकर तर सचिव पदी संदीप कापसेहर घर लंके का डंका, गल्ली बोळात तुतारी चा नाद घुमला डफड प्रचार ,जोरदार चर्चाअंबाजोगाई येथे विश्व वारकरी संघा च्या वतीने एक दिवशीय विराट किर्तन महोत्सवआळंदीत श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी नामजयघोषात४ जून ही इंडिया आघाडीची ‘एसपायरी डेट’ : पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

बीडमधून एक धक्कादायक बातमी : शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे यांच्यावर प्राणघातक हल्ला

धनंजय कुलकर्णी-उपसंपादक,दै.महाराष्ट्र सूर्योदय

बीडमधून एक धक्कादायक बातमी : शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे यांच्यावर प्राणघातक हल्ला

बीड(प्रतिनिधी):- बीडमध्ये शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना काल (बुधवार, ३ एप्रिल) सायंकाळी घडली. गाडी अडवून सात ते आठ जणांनी लोखंडी रॉडने जबर मारहाण केली असून या हल्ल्यात ज्ञानेश्वर खांडे हे गंभीर जखमी झाले आहेत.

काय आहे प्रकरण?

याबाबत अधिक माहिती अशी की, बीड येथील शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे काल (ता. ३ एप्रिल) बीडमधून म्हाळस जवळा या आपल्या गावाकडे जात होते. बीडपासून जवळच काही अंतरावर त्यांच्या गाडीला काही जणांनी हात करुन गाडी थांबवण्याचा इशारा केला. खांडे यांनी गाडी थांबवताच त्यांच्यावर काठ्या, लोखंडी रॉडने हल्ला चढवण्यात आला.

तसेच ज्ञानेश्वर खांडे यांच्यासोबत असलेल्या इतर दोघांनाही बेदम मारहाण करण्यात आली. या हल्ल्यामध्ये खांडे हे गंभीर जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान या हल्ल्या मागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

 

error: Content is protected !!