ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

*मुंडे बहीण – भाऊ राजकीय मदतीसाठी अनेकांना* *आमदारकीचे स्वप्न दाखवीत आहेत* – *बजरंग सोनवणे*

बीड :- मुंडे कुटुंब जातीवादाचा आधार घेऊन मते मागण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत मात्र त्यांच्या या प्रयत्नाला यश येणार नसल्याचे त्यांच्या लक्षात आल्यामुळे बहीण – भाऊ हे आता नव्या फार्म्युल्या नुसार निवडणुकीत मदत मिळावी म्हणून अनेकांना आमदार करण्याचे स्वप्न दाखवीत फिरत असल्याची प्रखर अशी टीका महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी केली आहे.

बीड लोकसभा निवडणुकीचे दिवस जसे जवळ येऊ लागले, तसे प्रतिस्पर्धी उमेदवार एकमेकांवर टीका – टिप्पणी, आरोप – प्रत्यारोप करू लागले आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी भाजपच्या प्रतिस्पर्धी उमेदवार व त्यांचे कुटुंब हे सत्तेत असताना जिल्ह्याचा विकास करू शकले नसून विद्यमान खासदारांना १० वर्षाच्या कार्यकाळात त्यांचा विकास फंड खर्च करता आला नाही. त्यामुळे त्यांचा फंड परत जाण्याची नामुष्की ओढवली. तर मते मिळविण्यासाठी विद्यामान आमदार सोडून त्या अनेकांना विधानसभेला आमदार करण्याचे स्वप्न दाखवीत आहेत. मात्र जिल्ह्यातील विधानसभेच्या जागा किती, त्याहून अधिक जणांना आमदार करण्याचे खोटे आश्वासन देत आहेत. हे मुंडे बहीण – भाऊ किती जणांना आमदारकीचे स्वप्न दाखवणार ? असा सवाल ही उपस्थित केला आहे

error: Content is protected !!