ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

फ्रंटीयर एजन्सीच्या विरोधात सफाई कामगारांची पोलीस अधीक्षकाकडे धाव – नऊ महिन्याच्या थकित वेतनाची मागणी

फ्रंटीयर एजन्सीच्या विरोधात सफाई कामगारांची पोलीस अधीक्षकाकडे धाव – नऊ महिन्याच्या थकित वेतनाची मागणी
बीड दि. १२ (प्रतिनिधी): प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी साफ-सफाई करणाऱ्या सफाई कामगारांना गेल्या नऊ महिन्यापासूनचे वेतन न दिल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे. वेठबिगारासारखे राबवून घेणाऱ्या खाजगी फ्रंटीयर एजन्सी आणि सब-एजन्सी विरोधात फौजदारी स्वरुपाचा गुन्हा नोंदवावा अशी मागणी सफाई कामगार संघटनेने बीड जिल्हा पोलीस अधीक्षकाकडे केली आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, सदरील सफाई कामगार नोव्हेंबर २०२३ पासून निवेदने देवून उपोषणे करुन थकित वेतनाची मागणी करत आहेत. त्यासाठी आरोग्य अधिकारी सरकारी कामगार अधिकारी आणि अपर जिल्हा दंडाधिकारी यांनीही फ्रंटीयर एजन्सीला वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत. मात्र, काहीच कार्यवाही झालेली नाही. गुडीपाडवा, डॉ. आंबेडकर जयंती सारख्या सणासाठी सुध्दा सफाई कामगारांना त्यांच्या कष्टाचे वेतन मिळाले नाही. त्यामुळे कॉन्ट्रॅक्ट लेबर ॲक्ट सेंट्रल रुल १९७१ आणि पेमेंट ऑफ वेजेस ॲक्ट अन्वये गुन्हा नोंदवून सफाई कामगारांना न्याय द्यावा अशी मागणी सफाई कामगार संघटनेच्या वतीने बीड जिल्हा पोलीस अधीक्षक यांना कण्यात आली आहे. सदरील तक्रार अर्जावर बालाजी खुरमुरे (अध्यक्ष), कॉ. नामदेव चव्हाण (सरचिटणीस) सह अन्य कामगारांच्या सहया आहेत.
error: Content is protected !!