ब्रेकिंग न्युज
आमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजीआज12 मे जागतिक परिचारिका दिनानिमित्तग्रामदैवत सालशिदबाबा यात्रा उत्सव उद्या दिनांक १२/०५/२०२४ वार रविवार यात्रेचे आयोजनआज कडा येथील उपमुख्यमंत्री अजित पवार व छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जाहीर सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.-आ. बाळासाहेब आजबे यांचे आवाहनजामखेड येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरीरोहितला राज्याचा नेता होण्याची घाई आणि लंकेंना लोकसभेत जाण्याची घाई – उपमुख्यमंत्री अजित पवार

चौंडी येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

चौंडी येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

जामखेड प्रतिनिधी;-तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा चौंडी येथे वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाची सुरवात राजमाता जिजाऊ माँ साहेब, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर,क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले,माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन केंद्र प्रमुख राजेंद्र त्रिंबके यांच्या हस्ते करून अभिवादन करण्यात आले. यावेळी देशभक्तीपर गीते, लोकगीत, शेतकरी गीते, कोळी गीते, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर गीत, हिंदी रिमिक्स, मराठी गीते या प्रकारच्या विविध गीतांवर विद्यार्थ्यांनी अफलातून अप्रतिम नृत्याचे सादरीकरण केले.

यावेळी केंद्रप्रमुख राजेंद्र त्रिंबके
,शिक्षक बँकचे संचालक संतोषकुमार राऊत, विकास मंडळ विश्वस्त मुकुंदराज सातपुते,शिक्षक नेते पांडुरंग मोहोळकर ,दक्षिण जिल्हाप्रमुख केशवराज कोल्हे,शिक्षक भारती संघटनेचे जिल्हा नेते धनाजी कारंडे,बाळासाहेब जरांडे,अशोक पोकळे, प्रवीण शिंदे, मोहसिन सय्यद, आरिफ सय्यद,नागनाथ गर्जे, रवि इंगुले,किशोर टकले,हनुमंत गोरे,रावसाहेब फूलमाळी, गुरुमाऊली चे नेते राजेंद्र हजारे,अंबादास तांबे,असल्म शेख,किरण भागवत आदी शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच प्राथमिक शिक्षक संघ व गुरुमाऊली-सदिच्छा मंडळाच्या वतीने तालुक्यातील प्रत्येक शाळा व विद्यार्थी विकासनासाठी स्नेहसंमेलनानिमित्त देण्यात येणाऱ्या २१००/- रूपये चा धनादेश सुपूर्द करण्यात आले. या कार्यक्रमासाठी चौंडी शाळेचे मुख्याध्यापक अनिल आव्हाड सर , राजेंद्र हजारे सर, पदवीधर शिक्षक बाबासाहेब नाकाडे सर, पदवीधर शिक्षक अविनाश नवसरे पदवीधर शिक्षक,अनिता जवणे मॅडम,असलम शेख सर,आंबादास तांबे सर,किरण भागवत सर,शाळा देवकरवाडी धुळाजी देवकाते सर, मुख्याध्यापक किशोर टकले सर,शाळा अहिल्यानगर – ज्योती कदम मॅडम,मुख्याध्यापक नागनाथ गर्जे सर आदींनी परिश्रम घेतले.चौंडी ग्रामस्थांनी स्नेहसंमेलनाचा मनमुराद आनंद लुटून बक्षीस रूपाने विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल आव्हाड यांनी केले तर सुत्रसंचलन बाळासाहेब तळेकर यांनी केले व आभार प्रदर्शन बाबासाहेब नाकाडे यांनी मानले.

error: Content is protected !!