ब्रेकिंग न्युज
आमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजीआज12 मे जागतिक परिचारिका दिनानिमित्तग्रामदैवत सालशिदबाबा यात्रा उत्सव उद्या दिनांक १२/०५/२०२४ वार रविवार यात्रेचे आयोजनआज कडा येथील उपमुख्यमंत्री अजित पवार व छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जाहीर सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.-आ. बाळासाहेब आजबे यांचे आवाहनजामखेड येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरीरोहितला राज्याचा नेता होण्याची घाई आणि लंकेंना लोकसभेत जाण्याची घाई – उपमुख्यमंत्री अजित पवार

तरूण पिढीने मुलांच्या शिक्षणाकडे अधिक लक्ष द्यावे – गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे

तरूण पिढीने मुलांच्या शिक्षणाकडे अधिक लक्ष द्यावे – गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे

जामखेड – महामानव मा. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला शिका , संघटीत व्हा, संघर्ष करा असा मोलाचा संदेश दिला त्यासाठी तरुण पिढीने मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष दिले पाहिजे ते पुढे कसे जातील यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. शिक्षणाशिवाय पर्याय नाही, जामखेड तालुक्याचे शैक्षणिक गुणवत्तेत वाढ झाली असून याचा मला अभिमान आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गोरगरीब मुलांना शिक्षण मिळावे यासाठी मी प्रयत्नवादी. पिढी चांगली कशी घडेल व ते मोठ्या पदावर गेली पाहिजे तसेच आजच्या तरुणांनी एकोप्याने जयंती साजरी करून एकोप्याने राहिले पाहिजे. असे यावेळी गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त बोलत होते.

जामखेड तालुक्यातील डोणगाव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते.तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे मिरवणूक काढण्यात आली. डि.जे च्या तालावर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जामखेड तालुका शिक्षक समन्वय समितीचे अध्यक्ष मुकुंदराज सातपुते पत्रकार धनराज पवार आदी डोणगाव ग्रामस्थ,माता भगिनी व भिमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लहान चिमुकल्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार राजेंद्र धनवे सर यांनी मानले.

error: Content is protected !!