ब्रेकिंग न्युज
आमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजीआज12 मे जागतिक परिचारिका दिनानिमित्तग्रामदैवत सालशिदबाबा यात्रा उत्सव उद्या दिनांक १२/०५/२०२४ वार रविवार यात्रेचे आयोजनआज कडा येथील उपमुख्यमंत्री अजित पवार व छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जाहीर सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.-आ. बाळासाहेब आजबे यांचे आवाहनजामखेड येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरीरोहितला राज्याचा नेता होण्याची घाई आणि लंकेंना लोकसभेत जाण्याची घाई – उपमुख्यमंत्री अजित पवार

पत्रकारांचा तोतया पत्रकार संभावना करणाऱ्या विजय जाधव या शिक्षकाचा जामखेड तालुका पत्रकारांकडून जाहीर निषेध, गुन्हा नोंद करण्याची मागणी !

पत्रकारांचा तोतया पत्रकार संभावना करणाऱ्या विजय जाधव या शिक्षकाचा जामखेड तालुका पत्रकारांकडून जाहीर निषेध, गुन्हा नोंद करण्याची मागणी !

जामखेड ;- जामखेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहा
येथील उपशिक्षक विजय जाधव
या शिक्षकाने पत्रकाराला तोतया पत्रकार म्हणून हिनवून अपमानीत केल्यामुळे सर्व पत्रकार बांधवांचा अवमान झाला आहे . त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी जामखेड तालूका पत्रकार संघाने केली असून त्याच्या वक्तव्य चा जाहीर निषेध करून तसे ‘ निवेदन मा. तहसिलदार , मा. पोलिस निरीक्षक यांना पत्रकारांनी दिले आहे .
याबाबत सविस्तर माहिती अशी की , श्री . सुजित सुभाष धनवे हे चित्रा न्युज डिजिटल मिडीया पोर्टलला काम करतात . गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी मोहा शाळेला भेट दिली होती त्यावेळी विजय जाधव हे शिक्षक शालेय कामी गैरहजर होते. त्याची बातमी चालविलेली होती. याचा राग मनात धरून जाधव यांनी सुजित धनवे यांना तोतया पत्रकार म्हणाले त्यामुळे त्यांचा अवमान झाला आहे.
या निवेदनावर सुजित धनवे, अजय अवचरे, नंदुसिग परदेशी, सुदाम वराट , पप्पू सय्यद, अविनाश बोधले, संजय वारभोग, किरण रेडे , अशोक वीर, दत्तराज पवार आदि पत्रकारांच्या सहया आहेत .

error: Content is protected !!