ब्रेकिंग न्युज
आमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजीआज12 मे जागतिक परिचारिका दिनानिमित्तग्रामदैवत सालशिदबाबा यात्रा उत्सव उद्या दिनांक १२/०५/२०२४ वार रविवार यात्रेचे आयोजनआज कडा येथील उपमुख्यमंत्री अजित पवार व छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जाहीर सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.-आ. बाळासाहेब आजबे यांचे आवाहनजामखेड येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरीरोहितला राज्याचा नेता होण्याची घाई आणि लंकेंना लोकसभेत जाण्याची घाई – उपमुख्यमंत्री अजित पवार

मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी ऐतिहासिक सायक्लोथाॅन सायकल व मोटरसायकल रॅली वडवणी शहरातून संपन्न…

मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी ऐतिहासिक सायक्लोथाॅन सायकल व मोटरसायकल रॅली वडवणी शहरातून संपन्न…
मतदारांनी मतदान करून आपले कर्तव्य पार पाडावे हातभर तक्रारीवर बोटभर उपाय म्हणजे मतदान – तहसीलदार दत्ता भारस्कर
वडवणी | प्रतिनिधी;-  ३९ बीड लोकसभा सार्वत्रिक  निवडणुकीसाठी मतदान सोमवार दि.१३ मे २०२४ रोजी होऊ घातलेले आहे या अनुषंगाने मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती दीपाताई मुधोळ मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली व निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी माजलगाव यांच्या सहकार्याने वडवणी तालुक्यातील मतदानाचा टक्का वाढवा म्हणून वडवणी येथील,तहसील कार्यालय,पंचायत समिती कार्यालय व गटशिक्षणाधिकारी कार्यालय  यांच्या संयुक्त विद्यमाने मतदान जनजागृती करण्यासाठी रविवार दि. २८ एप्रिल २०२४ रोजी आयोजित केलेली सायक्लोथाॅन सायकल व मोटर सायकल  रॅली वडवणी शहरातून संपन्न .
वडवणी शहरातील बीड-परळी राज्य महामार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून वडवणी तहसीलचे तहसीलदार दत्ता भारस्कर व गटशिक्षण अधिकारी बाबासाहेब उजगरे यांच्या उपस्थितीमध्ये सायक्लोथाॅन सायकल व मोटरसायकल रॅलीला प्रारंभ झाला तेथून वसंतराव नाईक चौक,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,चिंचवण रोडवरील चाटे चौक तसेच चौंडेश्वरी मंगल कार्यालय, श्रीराम मंदिर चौक,भीम नगर मार्गे तहसील कार्यालयाच्या प्रारंगणामध्ये या ऐतिहासिक भव्य मतदार जनजागृती रॅलीची सांगता झाली.
या रॅलीमध्ये लोकगीताच्या माध्यमातून मतदारांमध्ये मतदान जनजागृती केली,मतदारांना मतदानाची शपथ दिली तसेच गटशिक्षण अधिकारी बाबासाहेब उजगरे यांनी  आपले विचार व्यक्त करताना ते म्हणाले की,कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता निष्पक्ष व  निर्भयपणे मतदान करून लोकशाही जिवंत ठेवावी असे आवाहन त्यांनी मतदारांना केले तसेच वडवणी तहसीलचे तहसीलदार दत्ता भारस्कर साहेब यांनी मतदारांमध्ये जनजागृती करताना ते म्हणाले की, निवडणुका म्हणजे लोकशाहीचा उत्सव आहे निवडणुकापासून कोणीही वंचित राहणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावी तसेच आपल्या घरातील प्रत्येक मतदाराला मतदान केंद्र पर्यंत नेऊन आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे हातभर तक्रारीवर बोटभर उपाय म्हणजे मतदान सर्व मतदारांनी मतदान करावे वडवणी तालुक्याचा मतदानाचा टक्का ८०% पेक्षाही जास्त जावा अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली.
या रॅलीत सर्व शासकीय,निमशासकीय तसेच प्रशासकीय विभागाचे अधिकारी,कर्मचारी तसेच वडवणी शहरातील महाराणी ताराबाई व इतर शाळेमधील मुख्याध्यापक,शिक्षक, विद्यार्थी,पत्रकार,सामाजिक कार्यकर्ते,पालक व मतदार नागरिक  मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
error: Content is protected !!