ब्रेकिंग न्युज
सत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजीआज12 मे जागतिक परिचारिका दिनानिमित्तग्रामदैवत सालशिदबाबा यात्रा उत्सव उद्या दिनांक १२/०५/२०२४ वार रविवार यात्रेचे आयोजनआज कडा येथील उपमुख्यमंत्री अजित पवार व छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जाहीर सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.-आ. बाळासाहेब आजबे यांचे आवाहनजामखेड येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरीरोहितला राज्याचा नेता होण्याची घाई आणि लंकेंना लोकसभेत जाण्याची घाई – उपमुख्यमंत्री अजित पवारविखेंच्या धनशक्तीसमोर लंकेंची जनशक्ती भारी – आ.भास्कर जाधव

जातीपातीचे पाहण्यापेक्षा, जिल्ह्याच्या मातीला विकासाचे वैभव द्या  –  पंकजाताई मुंडे

जातीपातीचे पाहण्यापेक्षा, जिल्ह्याच्या मातीला विकासाचे वैभव द्या  –  पंकजाताई मुंडे

ताडसोन्ना गावात पंकजाताईंचे उत्स्फूर्त स्वागत..!

बीड प्रतिनिधी ;-विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. जातीपातीच्या राजकारणामुळे विकास कामात खीळ बसते. आणि हाती आलेला विकास कोसो दूर जातो. मुंडे साहेबांच्या जाण्याने विकासाचा प्रचंड अनुशेष जिल्ह्यात निर्माण झाला. आणि हा अनुशेष भरून काढण्यासाठी माझी उमेदवारी ही सुवर्णसंधी आली आहे. त्यामुळे कोणताही कलुषित भाव समाजाने न ठेवता विकासाचे ध्येय गाठण्यासाठी प्रत्येक समाजाने पुढे येऊन मतदान करावे. कोणत्याही अफवा आणि द्वेषाला बळी न पडता जातीपातीचे पाहण्यापेक्षा जिल्ह्याच्या मातीला विकासाचे वैभव देण्यासाठी कमळ  चिन्हावर मतदान करून मला सन्मानपूर्वक संसदेत पाठवा. असे आवाहन भाजपा महायुतीचे उमेदवार पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांनी ताडसोन्ना येथे बैठकीदरम्यान केले.

भाजपा महायुतीचे लोकप्रीय उमेदवार पंकजाताई गोपीनाथराव मुंडे थेट गाव खेड्यात जाऊन मतदारांशी संवाद साधत आहेत. भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली रात्री पालवण नंतर ताडसोन्ना ग्रामस्थांशी बैठक घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. रात्रीचे साडेबारा वाजले तरीसुद्धा मतदार बांधवांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले.

यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, सर्जेराव तांदळे, सोमनाथ दादा माने, बालासाहेब मुंडे, मनोज काका पाटील, विठ्ठल नाना शिंदे, वचीष्ठ मुंडे, संजय मुंडे, सोमनाथ वाडमारे,फिरोज सय्यद,नवनाथ मुंडे, सिताराम मुंडे, समीर सय्यद, सुरेश माने, विनायक मुंडे, गोरख मुंडे, अंबादास मुंडे, सद्दाम शेख, अच्युत मुंडे, कल्याण मुंडे, आत्माराम मुंडे, निसार सय्यद, गफार शेख, आसाराम मिसाळ, जमीर शेख, यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.

error: Content is protected !!