ब्रेकिंग न्युज
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना वादळाचा बसणार तडाखा; ताशी 40 KM वेगाने वाहणार वारेलोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी लिंबागणेश येथील फेव्हीस्टीक प्रकरणामुळे संवेदनशील मतदान केंद्राचा आयजी विरेंद् मिश्रा,एसपी नंदकुमार ठाकूर  यांच्याकडून आढावा जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !

गाव उजळवणारे सौर ऊर्जेचे खांब अंधारात; गावपुढा-यांच्या खिशात पैशाचा प्रकाश :- डॉ.गणेश ढवळे

गाव उजळवणारे सौर ऊर्जेचे खांब अंधारात; गावपुढा-यांच्या खिशात पैशाचा प्रकाश :- डॉ.गणेश ढवळे
बीड:- ग्रामीण भागातील अंधार दुर करण्यासाठी बहुतांश गावात सौरऊर्जेवर चालणारे खांबावरील सौरऊर्जेची प्लेट, बल्ब,बटरी आणि उभे केलेले खांब मात्र अंधारात खितपत पडलेल्या अवस्थेत आहेत.आमदार फंडातील २५-१५ आणि ग्रामपंचायत अंतर्गत १५ व्या वित्त आयोगातुन सौरऊर्जा खांबासाठी खर्च करण्यात आलेला लाखो रूपयांच्या पैसातुन मात्र गाव अंधारात असतानाही गावपुढा-यांचे खिसे प्रकाशमय झालेले दिसुन येत आहेत.त्यामुळे शासनाने गांभीर्याने सौर ऊर्जा खांबाची पहाणी करून सौर ऊर्जा पुर्ववत सुरू करावी आणि गावपुढा-यांनी गैरव्यवहार केलेला असेल तर आवश्यक कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे.
गावपुढा-यांचा मनमानी कारभार ; घरावर तर जनावरांच्या गोठ्यावर सौरऊर्जेचे खांब
गावातील सार्वजनिक प्रार्थना स्थळे, मुख्य चौक, प्रमुख रस्ते,गावची वेस, स्मशानभूमी, हातपंप,आदी ठिकाणी ग्रामस्थांना अंधा-या रात्रीत सुद्धा लख्ख प्रकाश असावा म्हणून लावण्यात येणारे सौरऊर्जेचे खांब गावपुढा-यांनी मनमानी कारभार करत स्वतःच्या अथवा मर्जीतील कार्यकर्ते यांच्या घरावर तर काही महाभागांनी स्वतःच्या शेतातील जनावरांच्या गोठ्यांवर लावलेले आढळुन येत आहेत.
नादुरुस्त सौरऊर्जा खांबाकडे सरपंच,ग्रामसेवकांचे दुर्लक्ष
सौरऊर्जा बल्ब खाबांकडे ग्रामपंचायत कार्यालय व ग्रामस्थांचे दुर्लक्ष झाल्याने.सौर ऊर्जेचे उभे केलेले खांब काही महिन्यातच बंद पडल्यानंतर त्याची वेळेवर गॅरंटी कालावधीत दुरुस्ती करणे आवश्यक असताना  सरपंच,ग्रामसेवक याकडे दुर्लक्ष करत असल्याने अखेर अडगळीत पडलेल्या खांबावर नादुरुस्त असलेल्या सौर ऊर्जेच्या प्लेट,बल्ब, बॅटऱ्या भुरट्या चोरांनी पळवल्याच्या घटना ब-याच ठिकाणी पहायला मिळतात. त्यामुळे वेळेवर नादुरुस्त बट-या जबाबदार सरपंच व ग्रामसेवकांनी वेळेवर दुरुस्ती करणे आवश्यक आहे.
error: Content is protected !!