ब्रेकिंग न्युज
लोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी लिंबागणेश येथील फेव्हीस्टीक प्रकरणामुळे संवेदनशील मतदान केंद्राचा आयजी विरेंद् मिश्रा,एसपी नंदकुमार ठाकूर  यांच्याकडून आढावा जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजी

हे सरकार काळ्या आईशी इमान राखणाऱया शेतकऱ्याचे नाही! शेवगावातील सभेत शरद पवार यांचा हल्लाबोल

हे सरकार काळ्या आईशी इमान राखणाऱया शेतकऱ्याचे नाही! शेवगावातील सभेत शरद पवार यांचा हल्लाबोल

शेवगाव;-‘आजपर्यंत न पाहिलेले राजकारण आता पाहत आहोत. राज्यात ऊस उत्पादकांसह शेतकऱयांचे अनेक प्रश्न आहेत. मात्र, या कष्टकरी माणसांकडे सरकार किती आस्थेने पाहत आहे, याबाबत मनात शंका येते. गुजरातमधील शेतकऱयांना कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली. गुजरातचे शेतकरी आमचे दुश्मन नाहीत; पण महाराष्ट्रातील शेतकऱयांनी काय घोडं मारलं होतं? ज्या शेतकऱयाला दोन पैशांचा फायदा होत होता, त्यावर यांनी बंदी घातली,’ असे सांगत, ‘हे सरकार काळ्या आईशी इमान राखणाऱया शेतकऱयांचे नाही,’ असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर केला.

महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ शेवगाव शहरातील खंडोबामाळये थे झालेल्याजाहीर सभेत शरद पवार बोलत होते. यावेळी काँग्रेसचे नेते-आमदार बाळासाहेब थोरात, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, प्रताप ढाकणे, महेबूब शेख, राजेंद्र फाळके, अशोक गायकवाड, ऍड. सुभाष लांडे, राजेंद्र दौंड, अभिषेक कळमकर, राजेंद्र दळवी, रामदास गोल्हार, हरीष भारदे आदी उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, ‘उसापासून अनेक उत्पादने होतात. देशात साखर आणि उसाचे सर्वाधिक उत्पादन महाराष्ट्रात होते. ज्यांच्या हातात दहा वर्षे सरकार होते, त्यांनी नोटाबंदी करून जनतेला लाइनमध्ये उभे केले. यामध्ये 700 लोकांचा मृत्यू झाला. हे सरकार जनतेचे नाही. सत्तेचा गैरवापर करणे हेच यांचे काम आहे,’ असा टोला पवार यांनी लगावला.

‘कोरोनासारखी परिस्थिती असताना नीलेश लंके यांनी 35 हजार लोकांना जीवदान दिले. कोरोनाकाळात हजारो लोक पायी-पायी त्यांच्या गावी गेले. या मेठय़ा संकटाच्या काळात मोदी सरकारने काही केले नाही. मात्र, लंके यांच्यासारख्या लोकांनी खूप काम केले. प्रश्न सोडविण्याऐवजी अटक करण्याची भूमिका मोदी सरकारने घेतली. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना अटक केली. त्यांनी दिल्लीत आरोग्य आणि शिक्षणासाठी किती काम केले आहे, हे आपण पाहिले आहे. या सरकारची हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू असून, हे लोक लोकशाही उद्ध्वस्त करीत असतील, तर तुम्हा-आम्हाला एकत्र यावे लागेल,’ असे आवाहन शरद पवार यांनी उपस्थित जनतेला केले.

‘शेवगावमध्ये ‘मिनी एमआयडीसी’ आणता येईल का, यासाठी प्रयत्न करू. ताजनापूरचे पाणी देण्यासाठी अनेकांनी संघर्ष केला. नऊ गावांना पाणी मिळावे म्हणून अनेकांनी माझी भेट घेतली. हा प्रश्न आम्ही सोडवू. नगर हा दुष्काळी जिल्हा होता. आता काही ठिकाणी पाणी आले. मात्र, हे काही समाधानकारक चित्र नाही. त्यामुळे विकासाला गती द्यायची गरज आहे,’ असे सांगत शरद पवार म्हणाले, ‘लोकशाहीमध्ये लोकांनी निर्णय घ्यायचा असतो. मात्र, कोणत्याच निवडणुका होत नाहीत. लोकांना लोकशाहीचा अधिकार द्यायचा नाही, ही त्यांची भूमिका असून, सध्या घटनाबाह्य काम सुरू आहे. त्यामुळे या लोकांना रोखण्यासाठी आपण लंके यांच्यासारखे उमेदवार निवडून द्या,’ असे आवाहन करीत, ‘अधिकार वाढविण्यासाठी मोदी सरकारची संविधानात, घटनेत बदल करण्याची भाषा सुरू आहे. अनेक खासदार संविधानात बदल करण्याची भाषा बोलत आहेत,’ असेही पवार यांनी सांगितले.

बाळासाहेब थोरात म्हणाले, ‘जनतेचा उमेदवार कसा असतो ते आपण पाहत आहोत. रात्री दोन-तीन वाजेपर्यंत लोक लंके यांच्यासाठी जागे राहतात. काय जादू आहे कळत नाही. म्हणून त्यांच्यामागे आम्ही उभे आहोत. सर्वसामान्यांच्या व्यथा दूर करण्याची धडपड त्यांच्यामध्ये आहे. नीलेश लंके आदर्श लोकप्रतिनिधी आहेत. पुढारी कुठे असतील, त्यांना तेथेच राहू द्या. त्रास देणे हाच त्यांचा पिंड आहे. आता सामान्य शेतकऱयाचा मुलगा पुढे आला आहे. तो आपल्या घरातील मुलगा आहे. आपली लढाई मोठय़ा शक्तीबरोबर आहे. त्यांचे गर्वहरण करायचे आहे. काळजी करू नका, मतदान करा,’ असे आवाहन त्यांनी केले.

नीलेश लंके म्हणाले, ‘देशाचे भवितव्य ठरविणारी ही निवडणूक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली, ती वाचविण्यासाठी निवडणुकीला आपण सर्वजण सामोरे जात आहोत. शेतकऱयांच्या मालाला बाजारभाव नाही, शेतकरी मरतोय; परंतु सरकार काही करीत नाही. पाच वर्षांपूर्वी ज्यांना संसदेत पाठविले, त्यांनी शेतकऱयांचा एक प्रश्न उपस्थित केला नाही. ‘खोटं बोल, पण  रेटून बोल’ ही त्यांची सवय आहे,’ असा टोला लंके यांनी विखे यांचे नाव न घेता लगावला. ‘समोरच्या माणसाच्या पायाखालची वाळू सरकली म्हणून ‘डमी’ लंके उभा केला आहे. मात्र, तुमच्या जीवावर निवडणूक आपणच जिंकणार आहोत,’ असा विश्वासही लंके यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. तालुकाध्यक्ष हरीश  भारदे यांनी आभार मानले. दीपक कुसळकर यांनी सूत्रसंचालन केले.

शिदे गटाचे आव्हाड राष्ट्रवादीत

शिदे गटाचे शिवसेना सहकार सेनेचे तालुकाध्यक्ष मारुती आव्हाड यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.

विखेंकडून सत्तेचा गैरवापर

‘विरोधी उमेदवार हे त्यांची सत्ता जनतेसाठी नव्हे, तर प्रतिष्ठsसाठी वापरत आहेत. आम्ही एखाद्या हॉटेलवर बसलो तरी दुसऱया दिवशी त्या हॉटेलवर कारवाई केली जाते. आमच्यासोबत फिरले तर गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जाते. त्यांच्याकडून सत्तेचा प्रचंड गैरवापर सुरू आहे,’ अशी टीका नीलेश लंके यांनी केली.

error: Content is protected !!