ब्रेकिंग न्युज
वाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान स्मशानभूमी अभावी अंत्यसंस्कार करताना वाद ही लाजीरवाणी बाब मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला सोयरसुतक नाही:- डॉ.गणेश ढवळेसोयाबीन पेरणी पूर्वी उगवण क्षमता तपासा :- कृषी विभागाचे आवाहन.स्नेह-75 च्यावतीने जागतिक कुटूंब दिनानिमित्त शर्मा परिवाराचा सत्कारजामखेड कृषी उत्पन्न बाजारचे सभापती पै. शरद कार्ले यांच्या सभापती पदाची वर्षपुर्ती.घाटशीळ पारगावात व्यापाऱ्याला मारहाणटँकरने पाणी पुरवठाबाबत अडचणी आल्यास संपर्क क्रमांकावर तक्रार करावीजातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवजामखेड येथे मधूरजल प्युअर वाॅटर चे उद्घाटन संपन्नरणविर काका पंडीत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

बीड जिल्हा जातीपातीच्या नव्हे तर कर्तृत्वाच्या मागे उभा राहतो-ना.धनजंय मुंडे

बीड जिल्हा जातीपातीच्या नव्हे तर कर्तृत्वाच्या मागे उभा राहतो-ना.धनजंय मुंडे

पंकजा मुंडे यांचा विजय निश्चित पण जास्त लीड देण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे-आ.आजबे

मतदार संघात जाती-पाती चे राजकारण होत नाही-माजी आ.भीमराव धोंडे

आष्टी(प्रतिनिधी)-लोकसभा निवडणुकीचा इतिहास लक्षात घेता बीड जिल्ह्यातील जागरूक जनता जातीपातीच्या मागे न जाता कर्तृत्वाच्या मागे उभे राहते असा इतिहास आहे असे प्रतिपादन कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले तर पंकजाताई मुंडे यांचा विजय निश्चित असून कर्तुत्ववान असलेल्या पंकजाताई मुंडे यांना साजेशी मताधिक्य आष्टी मतदार संघातून मिळण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन आमदार बाळासाहेब आजबे यांनी केले आष्टी विधानसभा मतदारसंघांमध्ये जातीय वाद होत नाही असे प्रतिपादन अध्यक्षीय समारोप करताना माजी आमदार भीमराव धोंडे यांनी केले.
बीड लोकसभा मतदार संघाच्या भाजपा उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्राचार्थ सोमवार दि.२९ रोजी दुपारी २ वा.आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत महाराष्ट्राचे कृषीमंञी ना.धनजंय मुंडे हे बोलत होते.या प्रचार सभेचे अध्यक्ष माजी आ.भीमराव धोंडे हे तर व्यासपीठावर आमदार बाळासाहेब आजबे,महानंद दुध संघाचे संचालक रामकृष्ण बांगर,भाजपा तालुकाध्यक्ष अॅड.साहेबराव म्हस्के,बीड जिल्हा माजी जि.प.अध्यक्ष डाॅ.शिवाजी राऊत,माजी जि.प.सदस्य दशरथ वनवे, भटक्या विमुत्त भाजपाचे अॅड.वाल्मिक निकाळजे,भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस डाॅ.अजय धोंडे,बबन झांबरे,भाऊसाहेब लटपटे,महाराष्ट्र केसरी सईद चाऊस,भाऊसाहेब घुले,अक्षय हाळपावत,धैर्यशिल थोरवे, यांच्यासह आदि उपस्थित होते.पुढे बोलतांना ना.धनंजय मुंडे म्हणाले,जरांगे पाटील यांच्या अंदोलनाचा सन्मान सरकारने राखला आणि विशेष अधिवेशन घेऊन दोन्ही सभागृहात मराठा समाजाला १०% आरक्षण देण्याचा कायदा केला.आणि हा कायदा सुप्रिम कोर्टात टिकावे म्हणून चॅलेज केले.आता जरांगे पाटलांनी सग्या सोयरांचा आरक्षण देण्याची मागणी केली ती ही सरकार पुर्ण करणार असल्याचे सांगितले.आणी या मनोज जरांगे यांच्या अंदोलनाचा फायदा सर्वात गरीब आणि बहुरंगी असलेल्या बीडच्या उमेदवाराने घेतला.आरे अजून जरांगे पाटील यांनी सुध्दा या आरक्षणाचा फायदा घेतला नाही.आणि या उमेदभाराने गरीब पाच पन्नास मराठा समाजाच्या तरूणांना देयचे तर आगोदर गावातील सेवासोसायटी साठी स्वत;चे ओबीसी प्रमाणपञ काढून घेतले आणि लोकसभेची निवडणूक जाती-पाती ची करता हे शोभते का? असा सवाल महाआघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना ना.धनजंय मुंडे यांनी केला तर आम्ही फक्त बीड जिल्ह्याच्या विकासाचे राजकारण करतो त्यामध्ये भेदभाव करत नसल्याचेही नामदार कृषी मंत्री धनंजय मुंडे यावेळी म्हणाले२०१९ च्या निवडणूकीत जे भाजपाच्या उमेदवारांना मताधिक्य दिले त्यापेक्षा जास्त मताधिक्य जास्त मिळवून पंकजा मुंडे यांना ऐतिहासिक विजय मिळवून देणार आहे.मी पहिल्यांना राजकारणात १९९५ ला सक्रीय झालो.अन् त्यावेळेस तत्कालीन उमेदवार रजनी पाटील यांचा भाजपाचा प्रचार केला.बीड जिल्ह्याचा पहिला खासदार म्हणून ब्राम्हण जातीचे परांजपे यांना निवडून दिले आहे.हि निवडणूक लोकसभेची निवडणूक असून जगाचे लक्ष याकडे लागले असुन याकडे उत्सव म्हणून पाहिले जात आहे.गेल्या दहा वर्षापासून भाजपाने काय काम केले हे आपण सर्व भारतीय पाहत आहोत.आता देशाने ठरविले आहे की नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्याचे ठरविले आहे.मग आपण बीड च्या लोकसभेत कमळाला मतदान करण्याचे का? ठरविले नाही.येथे माञ जाती-पातीचे राजकारण का करतात?आम्ही सर्व मिळवून बीडच्या विकासाचे राजकारण करत आहोत.१९७२ चा दुष्काळ हा पाण्याचा नव्हता तर अन्नधान्यचा होता.७० वर्ष एकहाती सत्ता काॅग्रेसने चालविली पण गेल्या १० वर्षात नरेंद्र मोदी यांनी जगावर पकड निर्माण केली.ते काॅग्रेसला का नाही जमले.
जगात आर्थिक पकड निर्माण करणारा जगात ५ व्या स्थानी केली आहे.जगात भारताचे नाव होत आहे आणि जिल्हा जाती-पातीचे राजकारण करता हे दुर्देव आहे.
आपण चुकीचे मतदान करून जिल्हा आणि देशाचे वाटोळे करू नका असेही आवाहनही ना.मुंडे यांनी केले.
कोरोना काळात १४० कोटी असलेल्या देशातील लोकांना लस दिलीच आणि इतर देशांनाही लस देऊन जीव वाचविले आणि हे सर्व करतांना मोदी यांनी जात-पात पाहिले नाही.अन् इथला बीडचा उमेदवार म्हणतोय की आपण कृषीमंञी असून,शेतक-यांसाठी काय केले.आरे मी शेतक-यांच्या खिशाला जळ न बसता त्यांना एक रूपायात पिक विमा दिला आहे.मी कृषीमंञी झाल्यावर महाराष्ट्रातील शेतक-यांना राज्य शासनाचे २ हजार रूपये देण्याचा निर्णय घेतला आहे.जिल्ह्यात आत्तापर्यंत कधीही निवडणूकीत जात-पात पाहिले नाही.महायुतीच्या काळात आष्टी तालुक्यातील सर्वात मोठे काम म्हणजे खुंटेफळ साठवण तलावाचे काम आम्ही पुर्ण करणार आहोत.तसेच या तालुक्यातून चन्नई-सुरत हा महामार्ग होणार असून त्याचे हब आष्टी तालुक्यात होणार आहे.मग याचा फायदा कुणाला होणार हे जरा उघड्या डोळ्याने पहा,आणि हा सध्याचा उमेदवार म्हणतात की,दहा वर्षात फक्त अंमळनेर पर्यंतच का?आहो आम्ही दहा वर्षात अंमळनेर पर्यंत आणली पण तुम्ही २०१९ पासून २०२४ पर्यंत कुठे साखर खाऊन झोपले होते का?असा सवाल ना.मुंडे यांनी बजरंग सोनवणे यांना केला आहे.ही निवडणूक जिल्ह्यातील सुक्षशीत बेरोजगारांना नोकरी,ऊस उत्पादक शेतकरी करायचा आणि बीडजिल्हि हा पश्चिम महाराष्ट्रा सारखे विकासाचे राजकारण केल्या शिवाय राहणार नाही.आणि एवढी निवडणूक संपल्यावर परत आपला संबंध नाही का?परत आम्हाला तुमच्याकडे येयचे नाही का?आपण जर चुकीचा निर्णय घेतला तर आपला जिल्हा पन्नास वर्ष मागे गेल्याशिवाय राहणार नाही.आपण देशाचा पंतप्रधान कोण होईल,जिल्ह्याचा खासदार कोण होईल हे बघू पण आपण आता गावातील पुढारी राहतोल का? याची जाणीव करून संपूर्ण निवडणूकीत गावातच लक्ष द्यावे आणि पंकजा मुंडे यांना जात-पात-धर्म सोडून निवडणूक आपल्या हातात घ्या असे आवाहनही ना.मुंडे यांनी केले.
आमदार बाळासाहेब आजबे म्हणाले,आजची सभा नसून ही कार्यकर्तांची बैठक आहे.आगोदर यांना या निवडणूकीचे महत्व समजून सांगणे गरजेचे आहे तेव्हा हे सर्वसामान्यांपर्यंत यांची माहिती पोहचविण्याचे काम करणार आहे.मला या निवडणूकीत हालगर्जीपणा नको आणि खाली लोकं ऐकत नाहीत हे उत्तर आपेक्षित नाही.
जर तुम्ही आपल्या जिल्ह्याच्या हितासाठी पंकजा मुंडे यांना निवडून देण्याची गरज का आहे हे समजून सांगावे.समाजावर बोलण्याची वेळ नाही पण आता नाईलाजास्तव बोलावेच लागले कारण मराठा आरक्षण संदर्भात राज्य शासनाने विशेष अधिवेशन घेऊन एकमुखाने हा आरक्षणाचा मुद्दाच्या ठराव मंजूर केला.आणि ज्याला काडीची अक्कल नाही असा कुणीतरी पुढे येऊन सांगतो की हे आरक्षण कोर्टात टिकणार नाही.जे आरक्षण दिले आहे ते टिकणारे दिले आहे.आणि जे आरक्षण टिकणारच नाही ते आरक्षण आपण मागत आहोत.आज आपल्याला सगळ्या समाजाची गरज आहे आणि सगळ्यांना एकञीत राहवे लागणिर आहे.१०% आरक्षण दिले ते टिकणारे आरक्षण आपल्याला सरकारने दिले आहे.आता सध्या खाली ज्या सोशल मिडीयावर प्रतिक्रीया येतात ते चुकीचे आहे पण आता त्यां थांबल्या पाहिजेत असेही आ.आजबे यांनी कार्यकर्त्यांना खडे बोल सुनावले.तसेच सध्या भावनिक होऊन मतदान न करता आपण मतदार संघाच्या विकासाठी प्रवाहबरोबर चालावे लागेल आणि तरच तालुका सुजलाम-सुफलाम होणार आहे.पण यासाठी पंकजा मुंडे यांना भरघोस मताने विजय करावे लागणार असल्याचेही आ.आजबे यांनी सांगीतले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आ.भीमराव धोंडे म्हणाले,देशात भाजपाचे सरकार येणार असून आपल्या बीड जिल्ह्याच्या विकासासाठी मोदी ओळखत असलेला उमेदवार आपल्या जिल्ह्याला निवडून देयचे आहे.कोरोना काळापासून भाजपा सरकारने जवळपास ८० कोटी लोकांना मोफत अन्नधान्य मिळत आहे.सरकारने मोफत विज द्यावी,जर मोफत वीज देणे शक्य नसेल तर सौर उर्जाचे प्रकल्प द्यावे अशी मागणीही माजी आ.भीमराव धोंडे यांनी कृषीमंञी धनंजय मुंडे यांच्याकडे केली आहे.
भाजपावर शेतकरी नाराज का?पण शेतक-यांचा भाजपाने केलेला फायदाही तुम्ही-आम्ही लक्षात घेतला पाहिजे भाजपाने सर्व घटकांचा विचार करत सर्व घटकांना समान न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.तसेच मागच्या २०१९ च्या निवडणूकीत मतदार संघातील १०० बुथवर कमळ मागे होते.पण आता आपण सर्व एकञ आहोत जास्तीत जास्त मते मिळतील.जातीवर राजकारण होत नाही जर जातीवर मते होत असती तर मी चार वेळेस या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे.२००९ मध्ये याच मतदार संघातील सुरेश धस हे स्व.मुंडे साहेबांच्या विरोधात उभे होते.त्यावेळेसही या मतदार संघाने स्व.मुंडे साहेबांना लिड दिली होती.त्यामुळे या मतदार संघात जाती-पातीच्या राजकारणाचा काहिही परिणाम होणार नाही असेही माजी आ.भीमराव धोंडे यांनी सांगितले.अॅड.साहेबराव म्हस्के,बबन झांबरे,शंकर देशमुख, वाल्मिक निकाळजे,रामकृष्ण बांगर,डाॅ.शिवाजी राऊत,यांची भाषणे झाली

error: Content is protected !!