ब्रेकिंग न्युज
मतदार यादीतून नावे गायब झालेल्यांना मतदानाची संधी द्यावी !स्वाराती रूग्णालयातील मशिन व यंत्रसामुग्री दुरूस्त करून रूग्णांचे हाल थांबवाकार,मोटारसायकल व बैलगाडीच्या तिहेरी अपघातात एक ठार चार जखमीअलंकापुरीत दिव्यांग बांधवांचे ज्ञानेश्वरी पारायण हरिनाम गजरात  अपयशाने खचून न जाता यशाला जिद्द परिश्रमाच्या जोरावर जीवन प्रकाश’माननर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्न

कुस्त्यांची परंपरा लोप पावत चालली आहे – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

कुस्त्यांची परंपरा लोप पावत चालली आहे – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर
नवगण राजुरी दि.29(प्रतिनिधी)ः- मैदानी आणि मर्दानी खेळ डोळ्याचे पारणे फेडणारे असून अनेक गावच्या कुस्त्यांची परंपरा लोप पावत चालली आहे असे प्रतिपादन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले.
नवगण राजुरी येथे प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी सय्यद जानपीर उर्स निमित्त शनिवार दि.27 रोजी संदल आणि भव्य मिरवणूक काढण्यात आली व दि.28 रोजी ताजी यात्रा आणि सोमवार दि.29 रोजी जंगी कुस्त्यांचे सामने संपन्न झाले. यावेळी जिल्ह्यातील कुस्तीगिर मल्लांनी हजेरी लावून लहान मोठ्या कुस्त्यांचे सामने झाले. कुस्ती विजेत्या मल्लांना बक्षीस देण्यात आले. याप्रसंगी रविंद्र क्षीरसागर, अरूण डाके, सुधाकर मिसाळ, हेमंत क्षीरसागर, बाळू आवारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, गेल्या अनेक वर्षापासूनची नवगण राजुरीच्या कुस्त्यांची परंपरा आहे. नानांच्या काळात नवगण राजुरीत जिल्ह्यात नंबर 1 कुस्त्या असायच्या. कुस्त्यांचा फड रंगत आणि खरी कुस्ती काय होती हे आम्ही बालपणी पहायचो. पुर्वीपासून काळ्या मातीचा फड जागवला आहे. ही परंपरा भविष्यात कायम रहावी. या कुस्त्यांच्या हंगामाला पुर्वी राज्यातून पैलवान यायचे आणि या स्पर्धा पहायला परिसरातून लोक येत होते. अनेक गावात कुस्त्यांची परंपरा होती, सध्या काही गावात ही परंपरा बंद होऊ लागली आहे असे त्यांनी सांगितले.
या कुस्त्याचा फड जिल्ह्यातील नामांकित पैलवानांनी हजेरी लावून गाजवला.

error: Content is protected !!