ब्रेकिंग न्युज
मतदार यादीतून नावे गायब झालेल्यांना मतदानाची संधी द्यावी !स्वाराती रूग्णालयातील मशिन व यंत्रसामुग्री दुरूस्त करून रूग्णांचे हाल थांबवाकार,मोटारसायकल व बैलगाडीच्या तिहेरी अपघातात एक ठार चार जखमीअलंकापुरीत दिव्यांग बांधवांचे ज्ञानेश्वरी पारायण हरिनाम गजरात  अपयशाने खचून न जाता यशाला जिद्द परिश्रमाच्या जोरावर जीवन प्रकाश’माननर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्न

कालभैरवनाथ महाराज – खंडोबा महाराज उत्सवाचे कुरुळीत आयोजन

कालभैरवनाथ महाराज – खंडोबा महाराज उत्सवाचे कुरुळीत आयोजन

पुणे आळंदी  प्रतिनिधी : येथील कुरुळी ( ता.खेड ) येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी मिती चैत्र वद्य ८ शके १९४६ बुधवार १ मे आणि गुरुवार २ मे रोजी श्री कालभैरवनाथ महाराज व श्री खंडोबा महाराज यांचा उत्सव कुरुळी नगरीत साजरा होत आहे.
कार्यक्रमाची रुपरेषा बुधवारी पहाटे श्रींची काकड आरती होईल. तदनंतर महापुजा, अभिषेक व आरती, श्रींना हारतुरे, मांडव डहाळे होणार आहे. त्या नंतर वाजता श्रींना चंदन उटी लावून श्री कालभैरवनाथ महाराजांच्या तांदळाला रुपाला मुर्ती रुप देण्यात येईल. पंरपरेनुसार आरती झाल्यानंतर महिलांना श्रींचे दर्शन घेण्यास मंदीरात प्रवेश देण्यात येईल. देवाचे १२ गाडे ओढण्याचा कार्यक्रम होईल. रात्री कै. विठाबाई भाऊ मांग नारायणगांकर यांच्या लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होईल. तदनंतर रात्री १०:०० ते ११:०० श्रींची पालखीचे मिरवणुक व शोभेच्या दारुची आतषबाजी होईल.
गुरुवारी दुपारी ०४:०० वाजता तुफानी निकाली जंगी कुस्त्यांचा आखाडा होईल. या सर्व कुस्त्या प्रामुख्याने निकाली होतील. रात्री ०७:०० वाजता जल्लोष लावन्यवतिंचा ॲार्केस्ट्रा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमास लाईट सांऊड स्पीकर व्यवस्था श्रीनाथ सांऊड सर्व्हिसचे मालक बजरंग बाळासाहेब लोखंडे यांनी केले. या प्रमाणे श्री कालभैरवनाथ महाराज व खंडोबा महाराज यांचा उत्सव होत आहे. कमिटीचे अध्यक्ष व त्यांचे सर्व सहकारी, ग्रामस्थांनी उत्सवाचे नियोजन केले आहे. भाविक, नागरिकांनी उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन कुरुळी ग्रामस्थांनी केले आहे.

error: Content is protected !!