ब्रेकिंग न्युज
मतदार यादीतून नावे गायब झालेल्यांना मतदानाची संधी द्यावी !स्वाराती रूग्णालयातील मशिन व यंत्रसामुग्री दुरूस्त करून रूग्णांचे हाल थांबवाकार,मोटारसायकल व बैलगाडीच्या तिहेरी अपघातात एक ठार चार जखमीअलंकापुरीत दिव्यांग बांधवांचे ज्ञानेश्वरी पारायण हरिनाम गजरात  अपयशाने खचून न जाता यशाला जिद्द परिश्रमाच्या जोरावर जीवन प्रकाश’माननर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्न

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडून पांढरवाडी येथील शेतकऱ्याचे नुकसान भरपाई देण्याचे आदेश

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडून पांढरवाडी येथील शेतकऱ्याचे नुकसान भरपाई देण्याचे आदेश
तुरीला शेंगा न आल्या प्रकरणी 70 हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश
शेतकऱ्याच्या तिन वर्षाच्या लढ्याला अखेर यश
गेवराई  प्रतिनिधी ;-तालुक्यातील पांढरवाडी येथील विश्वंभर टकले यांनी 2020-21 या हंगामासाठी अंबड येथील जय भगवान अॅग्रो ट्रेडर्स मधून महामंडळ महाबीज कंपनीचे तुर बियाणे खरेदी केले. विश्वंभर टकले यांनी त्यांच्या शेतात तुरीचा पेरा केला होता मात्र, ते बियाणे उगवले पण कंपनीने ठरवून दिलेल्या मुदतीत सदर तुरीच्या पिकास शेंगा लगाडल्या नाही. तुर बियाणे सदोष निघाल्याने व शेतकऱ्यांचा संपूर्ण हंगाम आणि मेहनत खराब करुन त्यांना अडचणीत टाकणाऱ्यांना बीड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने जय भगवान ॲग्रो ट्रेडर्स व महामंडळ महाबीज कंपनी, महाराष्ट्र स्टेट सीड्स कॉर्पोरेशन लि. या कंपनीला दंड ठोकला आहे. शेतकर्‍याला नुकसान भरपाई, शारीरिक व मानसिक त्रास आणि तक्रारीच्या खर्चापोटी एकूण 70 हजार रुपये भरपाई देण्याचा आदेश मंचाने दिला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील पांढरवाडी येथील ज्येष्ठ नाट्यलेखक विश्वंभर टकले यांनी 2020-21 या हंगामासाठी अंबड येथील जय भगवान अॅग्रो ट्रेडर्स मधून महामंडळ महाबीज कंपनीचे तुर बियाणे खरेदी केले. विश्वंभर टकले यांनी त्यांच्या शेतात तुरीचा पेरा केला होता मात्र, ते बियाणे उगवले पण कंपनीने ठरवून दिलेल्या मुदतीत सदर तुरीच्या पिकास शेंगा लगाडल्या नाही. याविषयी विश्वंभर टकले यांनी जय भगवान अग्रो ट्रेडर्स अंबड यांच्याकडे संपर्क केला. मात्र, त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे गेवराई येथील तालुका कृषी कार्यालयास रीतसर तक्रार केली या तक्रारीनंतर तालुका कृषी अधिकारी यांनी एक समिती नेमून सदर तक्रारीची पाहणी शेतामध्ये जाऊन केली. ज्यामध्ये स्वतः तालुका कृषी अधिकारी, कृषी तज्ञ, महामंडळ कंपनीचे अधिकारी, कृषी सेवक व इतर अधिकारी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सदर तक्रारीनुसार शेतामध्ये जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी असलेल्या परिस्थितीची पाहणी करून 90% शेंगा लगडलेल्या नसल्याचा अहवाल तालुका कृषी अधिकारी यांच्या वतीने व सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या समितीच्या वतीने देण्यात आला. या अहवालानुसार शेतकऱ्याने बीड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे धाव घेतली. दुकानदार जय भगवान अग्रो ट्रेडर्स अंबड व महामंडळ महाबीज कंपनी, महाराष्ट्र स्टेट सीड्स कॉर्पोरेशन लि. या दोघांविरुद्ध दिनांक 30 नोव्हेंबर 22 रोजी ही तक्रार दाखल करण्यात आली. आयोगाचे अध्यक्ष श्री हरीश गो. अडके, सदस्या श्रीमती सतिका ग. शिरदे यांच्या उपस्थितीत या तक्रारीवर सुनावणी होऊन दिनांक 5 एप्रिल 2024 रोजी निकाल देण्यात आला. यामध्ये शेतकऱ्याचे नुकसान झाले असल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे, गेवराई तालुका कृषी विभागाच्या समितीनेही महामंडळ कंपनीच्या तुर बियाण्यास 90% शेंगा लगडल्या नाही आसा असल्याचा अहवाल दिला होता. प्रतिस्पर्धी वकिलाने सदर बियाणे प्रयोगशाळेमध्ये तपासल्या नसल्याचे कारण देऊन आक्षेप घेतला होता परंतु या आक्षेपाचा आधार घेऊन तज्ञ समितीचा अहवाल नाकारता येणार नाही. यासाठी तक्रारदार यांचे विधीतज्ञ अॅड. नरेंद्र कुलकर्णी यांनी महाराष्ट्र राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या एका प्रकरणातील निवड्याचा आधार घेत, त्यात कृषी अधिकारी आणि कृषी तंत्रज्ञ यांची समिती कार्यदेशीर दर्जा प्राप्त आहे. त्यामुळे केवळ मोघम आक्षेपांच्या आधारे अशा समितीचा अहवाल बेदखल करता येणार नाही असे मत मांडले. त्यामुळे कृषी अधिकारी आणि तज्ञ यांचे तक्रार निवारण समितीच्या अहवालानुसार 90% टक्के बियाणे कमी प्रतीचे होते असा निष्कर्ष निघल्यामुळे तक्रारदार शेतकरी विश्वंभर टकले यांच्या बाजूने निकाल देण्यात आला. अॅड नरेंद्र कुलकर्णी यांचा युक्तिवाद व मांडलेला मुद्दा या प्रकरणी महत्त्वपूर्ण ठरला.
 महामंडळ महाबीज कंपनीने व जय भगवान ॲग्रो ट्रेडर्स अंबड यांनी तक्रारदार शेतकरी विश्वंभर टकले यांना नुकसान भरपाई 60 हजार रुपये, शारीरिक व मानसिक त्रासा साठी 5 हजार रुपये आणि तक्रारीच्या खर्चापोटी 5 हजार रुपये असे एकूण 70 हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, असा आदेश दिला आहे. या आदेशापासून 45 दिवसांत ही रक्कम न दिल्यास 8 टक्के व्याज आकारल्या जाईल, असेही त्यात नमूद आहे. या सर्व प्रकरणाचे काम बीडचे प्रसिद्ध विधीतज्ञ अॅड. नरेंद्र कुलकर्णी व तक्रारदार यांचे चिरंजीव सुशिल टकले यांनी पाहिले.
error: Content is protected !!