ब्रेकिंग न्युज
वाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान १००० कलशधारी सुवासिनी महिलांची प्रभात फेरी ठरणार लक्षवेधीजिल्ह्यात माणुसकी सेवा फाऊंडेशनचा झंझावात…युवकांनी सलोखा , बंधुत्व संबंध जोपासण्याची गरज –  ॲड. सुभाष (भाऊ) राऊतवाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान स्मशानभूमी अभावी अंत्यसंस्कार करताना वाद ही लाजीरवाणी बाब मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला सोयरसुतक नाही:- डॉ.गणेश ढवळेसोयाबीन पेरणी पूर्वी उगवण क्षमता तपासा :- कृषी विभागाचे आवाहन.स्नेह-75 च्यावतीने जागतिक कुटूंब दिनानिमित्त शर्मा परिवाराचा सत्कारजामखेड कृषी उत्पन्न बाजारचे सभापती पै. शरद कार्ले यांच्या सभापती पदाची वर्षपुर्ती.घाटशीळ पारगावात व्यापाऱ्याला मारहाण

महाराष्ट्र दिनी आळंदीत रक्तदान शिबीर उत्साहात १०५ रक्तदात्यांचा सहभाग ; १५० वर नागरिकांची आरोग्य तपासणी

महाराष्ट्र दिनी आळंदीत रक्तदान शिबीर उत्साहात
१०५ रक्तदात्यांचा सहभाग ; १५० वर नागरिकांची आरोग्य तपासणी

पुणे आळंदी / प्रतिनिधी : येथील डुडुळगावात १ मे कामगार, महाराष्ट्र दिन आणि सामाजिक कार्यकर्ते प्रदीप तळेकर यांच्या वाढदिवसा निमित्त सामाजिक बांधिलकी जोपासत तसेच अनावश्यक खर्च टाळून रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात आयोजित करण्यात आले. या शिबिरात १०५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच आरोग्य तपासणी शिबिरात १५० वर नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक रक्तदात्यास एक टी शर्ट, प्रमाणपत्र आणि एक तुळशी वृंदावन भेट देऊन सन्मानित करण्यात आले. गेल्या ४ वर्षां पासून सामाजिक बांधिलकीतून आरोग्य विषयक उपक्रम राबविण्यात येत आहे. सुमारे १०५ रक्तदात्याने यामध्ये सहभाग घेतला. १५० हून अधिक लोकांनी आपले मेडिकल चेकअप करून घेतले. महिला नागरिकांची उपस्थिती लक्षणीय होती. रक्तदान आणि मेडिकल चेकअप शिबिराचे नियोजन टाटा मोटर्स कार प्लांट युनिट अध्यक्ष योगेश तळेकर, प्रदीप तळेकर मित्र परिवार, महिंद्रा अँड महिंद्रा मित्र परिवार, टाटा मोटर्स मित्र परिवार, डुडूळगावमधील सर्व सोसायटी मित्र परिवार व समस्त ग्रामस्थ डूडुळगाव यांच्या वतीने श्री संत सावतामाळी मंदिर डुडूळगाव येथे करण्यात आले.
पिंपरी चिंचवड ब्लडबँक आणि कमलेश मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल डुडूळगाव यांच्या विशेष सहकार्याने शिबीर यशस्वी झाले. यावेळी कामगार नेते सचिन लांडगे, गणेश सस्ते, पुणे युवासेना जिल्हा प्रमुख धनंजय पठारे, आळंदी शिवसेना शहर प्रमुख राहुल चव्हाण, साईनाथ ताम्हाणे, रमेश वहिले, बजरंग वहिले, दामोदर वहिले, सचिन तळेकर, शंकर वहिले, संदिप तळेकर, सागर तळेकर, अमोल धायरकर, उमेश तळेकर, पंडित तळेकर, सचिन पवार, कैलास वहिले, विक्रम वहिले, सचिन वहिले, सागर तापकीर, सागर वहिले, विजय चव्हाण, विजय पोफळकर आदी मान्यवर उपस्थित होते. रक्तदात्यांचे आभार मनात सत्कार करण्यात आला.

error: Content is protected !!