ब्रेकिंग न्युज
भाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरगेवराई तालुक्यातील ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरला डिझेल वाचून वारंवार ब्रेकशेती विकत नसल्याने महिलेचा विनयभंग करून पतीस मारहाण सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होणारघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेनिघोजे ग्रामपंचायत उपसरपंचपदी इंदिरा फडके बिनविरोध‘सायकल चालवा,हृदयरोग टाळा,पायी चाला हृदय सांभाळा’        आर्वी येथे मंगळवारपासून वार्षिक हरिनाम सप्ताह

जामखेड शहरात डॉ सुजय विखेंच्या प्रचारासाठी महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या काॅर्नर सभा

जामखेड शहरात डॉ सुजय विखेंच्या प्रचारासाठी महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या काॅर्नर सभा

येणा-या स सर्वच निवडणुकांसाठी एकत्र ; मंत्री विखे आणि आ. शिंदेची ग्वाही!

जामखेड, दि. ४ प्रतिनिधी :-“माझ्या आणि आ.राम शिंदे यांच्‍या मध्‍ये आता कोणतेही मतभेद राहीलेले नसुन यापुढील सर्व निवडणूका आम्ही एकत्रित येवून एक विचाराने लढविणार आहोत,” अशी ग्‍वाही राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पा. व माजी मंत्री आ.प्रा.राम शिंदे यांनी आज जामखेड शहरातील चुंभळी येथील जाहीर सभेत दिली.
लोकसभा निवडणूक प्रचाराच्‍या निमित्‍ताने शहरातील जांबवाडी, तपनेश्‍वर, छत्रपती शिवाजी महाराज पेठ, शिवाजी नगर, संताजी नगर, सदाफुले वस्‍ती, आरोळे वस्‍ती आणि चुंभळी येथे नागरीकांच्‍या भेटी घेवून संवाद साधला. केंद्र आणि राज्‍य सरकारने घेतलेल्‍या निर्णयांची माहीती देवून महायुतीच्‍या उमेदवाराला खंबीरपणे साथ देण्‍याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी माजी मंत्री आ.राम शिंदे,शिवसेना नेते बाबुशेठ टायरवाले, भाजपा नेते विनायकराव देशमुख, जामखेड तालुका अध्यक्ष अजय काशिद, शिवसेना तालुकाप्रमुख प्रा कैलास माने, मनसे तालुका अध्यक्ष प्रदीप टापरे,राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष महेश निमोणकर,माजी सभापती डॉ भगवान मुरूमकर, बाजार समितीचे सभापती पै शरद कार्ले,नगरसेवक अमित चिंतामणी, प्रा.संजय राऊत,बिभिषण धनवडे, हज कमिटी सदस्य सलिम बागवान, पोपट राळेभात,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष बाजीराव गोपाळघरे, शहराध्यक्ष पवन राळेभात, देविदास भादलकर, मुस्तफा (मेजर) शेख,सोमनाथ राळेभात, गुलशन अंधारे, मनोज कुलकर्णी, सुरेश जाधव, मकरंद काशिद, बाबासाहेब देशमाने,प्रविण चोरडिया, एडवोकेट बंकटराव बारवकर, प्रविण सानप, मोहन गडदे,गोरख घनवट,संपत राळेभात,मनसे तालुका उपाध्यक्ष सनि सदाफुले, राम पवार,सोमनाथ पाचरणे,मोहन देवकाते, विष्णू गंभीरे,प्रविण बोलभट, बाळासाहेब गायकवाड, उध्दवराव हुलगुंडे,विक्रांत घायतडक, आण्णा ढवळे , शिवकुमार डोंगरे,विजय कुलकर्णी, ऋषिकेश मोरे, तुषार बोथरा
आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चुंभळी येथील कार्यक्रम सुरु होताच, उपस्थितांनी आ.राम शिंदे यांच्‍यावर होत असलेल्‍या अन्‍यायाचा प्रश्‍न उपस्थित केला. आ.शिंदे यांनीच या चर्चेत हस्‍तक्षेप करुन,” मंत्री विखे पाटील आणि माझ्यामध्‍ये आता कोणतेही मतभेद राहीलेले नाहीत. आपल्‍याला आता महायुतीच्‍याच उमेदवाराचे काम करायचे आहे. या भागातून शंभर टक्‍के मतदान हे महायुतीच्‍या उमेदवारालाच होईल, असे काम करायचे आहे .” असे सांगून त्‍यांनी हा विषय संपविला.
याच विषयाचा उल्‍लेख करुन, मंत्री ना. विखे पाटील यांनीही चुंभळी येथील श्री.मस्कोबा महाराजांच्‍या देवस्‍थानाचा उल्‍लेख करुन, आमच्‍या लोणी बुद्रूक गावाचे ग्रामदैवत सुध्‍दा म्‍हसोबा महाराज आहेत. या देवस्‍थानांच्‍या साक्षीने सांगतो की, “आमच्‍या दोघांमध्‍ये आता कोणतेही मतभेद नाहीत. यापुढील सर्व निवडणूका आम्ही एकत्रितपणेच लढविणार आहोत. याबाबत कुणीही मनात संभ्रम ठेवु नये.”

error: Content is protected !!