ब्रेकिंग न्युज
श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगीमराठा आरक्षणासाठी 32 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवनभाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

आष्टी येथे होणाऱ्या शरदचंद्रजी पवार यांच्या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे -प्रदिप थोरवे

आष्टी येथे होणाऱ्या शरदचंद्रजी पवार यांच्या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे -प्रदिप थोरवे
बीड/आष्टी-महाविकास आघाडीचे बीड लोकसभेचे उमेदवार बजरंग (बप्पा) सोनवणे यांच्या प्रचारार्थ सोमवार दिनांक ६ मे रोजी सकाळी ११ वाजता आष्टी येथील ईदगाह मैदान येथे मा शरदचंद्रजी पवार साहेब यांची जाहीर सभा होणार असून सर्वांनी या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आम आदमी संघटनमंत्री प्रदिप भैय्या थोरवे यांनी केले आहे.
बीड लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग (बप्पा) सोनवणे यांनी संपूर्ण जिल्हा पिंजून काढला असून सर्व सामान्य नागरिकांचा त्यांना मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. सदरील निवडणूक ही जनतेने हातात घेतली असल्याने बजरंग सोनवणे यांचा विजय निश्चित झाला आहे.त्यामुळे आष्टी मतदार संघाचा विकास करण्यासाठी बजरंग (बप्पा) सोनवणे यांच्या प्रचारार्थ माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब ,भूषणसिंह राजे होळकर यांची आष्टी येथे सोमवारी सकाळी ११ वाजता जाहीर सभा होणार आहे.या सभेस उपस्थित. महेबूब शेख,आ.संदीप  क्षीरसागर. जीवनराव गोरे. मा.आ सय्यद सलीम. मा आ साहेबराव दरेकर,,मा आ उषा दराडे, मा आ पुर्थ्वीराज साठे,मा आ  बदामराव पंडित, मा आ राजेंद्र जगताप, सुशीला मोराळे,बबन गिते, शिवसेना जिल्हाप्रमुख  (उबाठा), परमेश्वर सातपुते, आष्टी विधानसभा राम खाडे, अण्णासाहेब चौधरी, काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, काॅग्रेस तालकाध्यक्ष रवि ढोबळे, मिलींद आव्हाड मानव हक्क अभियान चे राष्ट्रीय अध्यक्ष,ॲाल इंडीया पॅंथर दिपक भाई केदार ,डेमोक्ट्रीक पार्टी चे प्रदेश अध्यक्ष अजिंक्य चांगणे,अहमद पठाण             ॲड.किशोर मुळे,  सुनील नाथ, अमोल तरटे, आप चे अशोक येडे, ऑल इंडिया पँथर जिल्हा अध्यक्ष उपस्थित राहणार आहे. तसेच आष्टी विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी,  सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कष्टकरी तसेच कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन प्रदिप भैय्या थोरवे यांनी केले आहे.
error: Content is protected !!