ब्रेकिंग न्युज
गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगी

पंकजाताईच राजकारण सर्व समावेशक ,त्या खासदार होण , बीड जिल्ह्याच्या विकासाचा दरवाजा खुला करण

पंकजाताईच राजकारण सर्व समावेशक ,त्या खासदार होण , बीड जिल्ह्याच्या विकासाचा दरवाजा खुला करण

देशाचे नेतृत्व करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागच्या दहा वर्षात भारताचा चेहरामोहरा बदलत जगाच्या पाठीवर सर्व शक्तिमान म्हणून ओळख निर्माण करताना विकासाच्या प्रक्रियेत हाती घेतलेला संकल्प पुर्ण करून दाखवताना दिलेले आश्वासन १०० टक्के पुर्ण करून दाखाले. काश्मिरमधील ३७० कलम हाटवताना प्रभु रामचंद्र मंदिर आयोध्येत निर्माण केले. म्हणूनच की काय त्या नेतृत्वाविषयी सामान्य जनतेच्या मनात विश्वास निर्माण झाला. उद्याच्या निवडणुकीला सामोरे जाताना १०० टक्के मोदी गॅरंटी जनतेला कळून चुकलं. त्याच पार्श्वभुमीवर बीड जिल्ह्याचं २०१४ ते १९ नेतृत्व करताना पालकमंत्री म्हणून पंकजाताईनं विकासाची महाचळवळ आपल्या जिल्ह्यात राबवताना सबका साथ- सबका विकास, शत्रुच्याही गावात विकास निधी देवुन त्यांची मने जिंकली. हे नेतृत्व गप्पा मारत नाही, फुकटचे आश्वासन देत आणि दिलेला शब्द पाळते याची खात्री सर्वसामान्य जनतेला आल्याने या निवडणुकीत देखील पंकजाताईच्या विकास गॅरंटीवर जनतेचा विश्वास म्हणुनच त्यांना देशाच्या संसदेत पाठवण्याचा जिल्हावासियांनी १०० टक्के निर्धार केला. शंका घेण्याचे मुळीच कारण नाही. दबक्या आवाजात सुरू असलेल्या चर्चा केवळ विरोधकांचं राजकिय भांडवलच म्हणावे लागेल.

राजकिय नेतृत्वाच्या अंगी कर्तृत्व असल्यानंतर सामान्य लोकांना त्या नेतृत्वाविषयी हदयात जागा मिळते. लोकशाहीत निवडणुकीत सामोरे जाताना विरोधकांनी कितीही अकांडतांडव केले तरी ४०० पार होण्यासाठी सामान्य माणसाचा हातभार मतदानाच्या रूपाने लागतो जे की उद्याच्या होवु घातलेल्या लोकसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बसवण्यासाठीच देशात सर्वसामान्य माणुस पुढे आलेला लक्षात येतो. बीड लोकसभा मतदारसंघात देशात जसं चित्र तसंच चित्र निर्माण झालेले असुन मोदीकी गॅरंटी तसं पंकजाताईकी गॅरंटी यात कुणालाही शंका घेण्याचे कारण वाटत नाही. पंकजाताईनं लोकसभा लढवावी अशा सुचना जणु काही थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच केल्या. ज्यामुळे निवडणुकीच्या मैदानात स्वतःच उतरल्या. मागे वळुन पहाताना विद्यमान खा. प्रितमताई असो किंवा पंकजाताई यांच्या विरोधात शरद पवार गटाला देखील उमेदवारच मिळाला नाही. शेवटच्या पंधरा दिवसात आता ज्यांना उमेदवारी त्यांनी दिली बजरंग सोनवणे पवार राष्ट्रवादी गटाचेच होते. ज्यांचा मागच्या लोकसभेत राष्ट्रवादी एकसंघ असतान पदा 3/5 पराभव झाला. नेतृत्वाची कसोटी कशी असते बघा ? सोनवणे यांचा पराभव झाल्यानंतर पाच वर्षात हे महाशय कुठल्या बीळात लपले देव जाणे? एकदाही तोंड जनतेला दाखवलं नाही. त्यांना पाथ लाख सात हजार मते पडली. त्यांची देखील अवहेलना त्यांनी केली. करोनासारख्या संकटात म्हणा किंवा नैसर्गिक आपत्ती म्हणा एवढेच नव्हे तर जनतेच्या सुखदुःखात देखील बिचारे बजरंग कधीच भेटायला आले नाहीत तर दुसऱ्या बाजुने नेतृत्वातले गुणं अवलोकन करायचे झाल्यास फरक लक्षात येतो की. पंकजाताई संविधानाच्या कुठल्याही पदावर नसताना त्यांनी आपल्या जिल्ह्यातील माय-बाप जनतेशी असलेली ऋणानुबंधाची नाळ कधीच तोडली नाही. करोनासारख्या संकटात भगिनी डॉ. प्रितमताई पीपी किट घालुन रूग्णांना भेटत होत्या. अतिवृष्टी झाली, वादळवारा झाला तर शेतकऱ्यांच्या बांधावर पहिला पाऊल पंकजाताईचा पडला. गोरगरिब जनतेच्या आरोग्य रक्षणासाठी महाआरोग्याचे शिबीरं यज्ञ स्वरूपात त्यांनी राबवले, सामान्य जनतेच्या सुखदुःखात राजकिय विजनवासात असताना देखील स्वतः पंकजाताई सतत राहिल्या. विकास हे तर त्यांच्या नेतृत्वाचा खऱ्या अर्थाने अविभाज्य घटकच म्हणावा लागेल. पालकमंत्री म्हणुन त्यांनी ज्या प्रकारे आपल्या जिल्ह्यात काम केले, लोक अजुनही विसरलेले नाहीत. पालकत्व आणि त्याचं उत्तरदायित्व कसं करावं लागतं? हा आदर्श त्यांनी सत्तापदाच्या काळात त्यांनी दाखवुन दिला. जातीपातीच्या मिती तोडून वैचारिक संस्कृती रुजवण्याचं कार्य जिल्ह्यात करून दाखवलं. कुणाचा द्वेष करत तिरस्काराचं राजकारण त्यांनी न केल्यामुळे शत्रु देखील त्यांना नमस्कार घालण्यासाठी रांगेत उभे रहायचे. जिल्ह्यातील असं एक गाव शोधुन सापडणार नाही जिथे पंकजाताईच्या काळात विकास पोहोचला नाही. प्रचाराच्या निमित्ताने त्या जेव्हा ग्रामीण भागात मतदारांना भेटतात. त्यावेळी लोकच पुढे येवुन त्यांना सांगतात की ताई तुम्ही आमच्या गावाला योजना दिल्यात, आता आम्ही तुम्हालाच मतदान करणार. २०१४ ला स्व. गोपीनाथराव मुंडे यांचे निधन झालं तेव्हा खा. प्रितमताईच्या रूपाने पंकजाताईनं रेल्वे आणि रस्त्याचे शब्द दिले. ते अगदी पुर्ण करून दाखवले. प्रितमताईनं दोन्हीही प्रश्नावर जीवाचं रान करत पंकजाताईच्या मार्गदर्शनाखाली आपल्या जिल्ह्यात २६१ किमी. अंतर असलेली रेल्वे बीडच्या सीमेवर आणुनच दाखवली. कदाचित एवढा मोठा प्रकल्प आणि अधुनमधुन निधीची टंचाई त्यामुळे अजुन एखाद्या वर्षात वैद्यनाथाच्या पावनमुमीत रेल्वे धडकलेली दिसेल. पण या निमित्ताने पंकजाताईच्या विकासाची गॅरंटी १०० टक्के लोकांना मिळालेली आहे. या मतदारसंघात तिरंगी लढतीचं चित्र स्पष्ट होताना गुणात्मक नेतृत्वाची तुलना लोक आता करू लागले. पंकजाताई म्हणजे विकासाचा सकारात्मक चेहरा आणि १०० टक्के गॅरंटी त्या काय करू शकतात? हे माय-बाप जनतेने पालकमंत्री पदाच्या काळात अगोदरच पाहिले असल्याने नवी ओळख देण्याची गरज कुणाला वाटत नाही. उद्या चालुन त्यांना जिल्ह्यात एक मोठा उद्योग ज्यामुळे किमान दहा हजार तरूणांच्या हाताला काम मिळेल आणि सामान्य जनतेच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी कॅन्सरसारखं अद्ययावत हॉस्पीटल एवढेच नव्हे तर अशा अनेक विकासाच्या योजना ज्यामुळे आपला जिल्हा विकास प्रक्रियेत पुढे जाईल या त्यांच्या मनातल्या कल्पना. निवडणुकीला सामोरे जात असताना मी हे करणार असं त्या जेव्हा बोलतात तेव्हा १०० टक्के पंकजाताई करूनच दाखवणार ही गॅरंटी आता लोकांना पटली. म्हणूनच देशात मोदी गॅरंटी तसं बीड जिल्ह्यात पंकजाताई गॅरंटी हे समीकरण जुळल्यामुळे कुणी काहीही म्हणत असेल किंवा विरोधक जातीपातीचं राजकारण करू पहात असले तरी सामान्य माणुस, शेतकरी, कष्टकरी, वंचित, उपेक्षित, व्यापारी, महिला, तरूण वर्ग, गोरगरिब या सर्वांना पंकजाताईच्या साठी मतदान करण्याची संधी मिळाली हेच भाग्य वाटत असल्याने मतदारांना केवळ तो दिवस कधी येणार? १३ मे ज्या दिवशी आपल्या लाडक्या नेतृत्वाच्या नावापुढे कमळ चिन्हाचा पाऊस पडणार हे आता स्पष्ट झालं. या नेतृत्वाच्या बाबतीत एक अशी नकारात्मक चर्चा करायला कुठेही संधी नाही. त्याचं कारण उमेदवार सर्वांच्या पसंतीचा महायुतीने देखील दिल्याने लोक गावागावात जोरदार स्वागत करताना दिसतात. अन्य मतदारसंघात महायुतीतल्या घटक पक्षाचं स्थानिक पातळीवर मनोमिलन होण्यास बराच वेळ लागतो. अनेक ठिकाणी कदाचित झालं नाही पण बीड लोकसभा मतदारसंघ या साऱ्या पार्श्वभुमीला अपवाद असुन महायुतीचे सर्व प्रमुख जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, प्रमुख पदाधिकारी आणि सामान्य कार्यकर्ते विजय संकल्पाच्या लढाईत तन मन धनाने सहभागी झाल्याचे दिसुन येते. म्हणून निवडणुक अटीतटीची कुठेही नाही. केवळ चर्चाही अगळपगळ रंगीन दिसते, अंतर्मनात डोकावून पाहिल्यानंतर जिल्ह्यातील मतदार पंकजाताईच्या
विजयासाठी आतुर झाला. कारण विकासाची गॅरंटी लोकांना वाटते. कोणत्याही गावात उमेदवार म्हणुन त्या जेव्हा जातात उत्स्फुर्त असं स्वागत लोक करतात.

error: Content is protected !!