ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

आज आष्टी तालुक्यातील वाघळुज येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत संवाद बैठक

आज आष्टी तालुक्यातील वाघळुज येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत संवाद बैठक

आष्टी प्रतिनिधी;-मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण राज्यामध्ये लढा लढविणारे संघर्षयोद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत आष्टी तालुक्यातील वाघळूज येथे मराठा समाजाची संवाद बैठक आज दि.९रोजी गुरुवारी सायंकाळी सहा वाजता होणार आहे. या संवाद बैठकीला मोठ्या सभेचे स्वरूप आले असून जवळपास शंभर एकरमध्ये या सभेची तयारी पूर्ण झाली आहे.

आठ जून रोजी नारायणगड येथे मराठा समाजाची मोठी सभा होणार आहे. याच सभेच्या पूर्वतयारीसाठी आष्टी तालुक्यातील वाघळूज येथे गुरुवारी सायंकाळी सहा वाजता संवाद बैठक होणार आहे. नगर बीड राष्ट्रीय महामार्गावर वाघळूज येथील आंबेश्वर कृषी पर्यटन केंद्रा शेजारच्या लगत 100 एकर जमिनीमध्ये या संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या आठ दिवसापासून या संवाद बैठकीची जोरदार तयारी सुरू झाली असून लाखो मराठा समाजबांधव या ठिकाणी एकत्रित येणार आहेत. लोकसभा निवडणुक मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असताना आष्टी तालुक्यामध्ये जरांगे पाटील यांची संवाद बैठक होत असल्याने या बैठकीमध्ये पाटील कोणती भूमिका स्पष्ट करतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

error: Content is protected !!