ब्रेकिंग न्युज
बारावी सायन्स नंतर डी फार्मसी का करावे?अहिल्यामाई होळकर यांच्या जयंती निमित्त व माता रमाईच्या स्मृती दिनानिमित्त बामसेफचे एक दिवसीय प्रशिक्षण शिबिरसौ.के.एस.के. महाविद्यालय दिनांक 27 व 28 मे 2024 रोजी  होणार्‍या नॅकसाठी सज्जधारूर येथील कब्रस्तान ची जागा कागदोपत्री चुकीची माहिती नोंदवून अकृषी करून घेतलीआमदार रोहित पवार यांनी पै.दादासाहेब (हवा शेठ) सरनोबत यांची भेट घेवून केलं सांत्वन…महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व गेवराई पत्रकार संघ गेवराई ची कार्यकारणी जाहीरनाथपंथी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द -डॉ.योगेश क्षीरसागरगोरबंजारा धर्मपीठ हामुगड अथणी-कर्नाटक येथे २६ व २७ मे रोजी राष्ट्रव्यापी बंजारा संमेलनाचे आयोजनमनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करा- सकल मराठा समाजकुणबी प्रमाणपत्राला वेळ मागील दोन महिन्यांपासून संबंधित अधिकाऱ्यांकडुन वारंवार मागणी करूनही स्वाक्षरी मिळत नाही…..

मुख्यमंत्री अ‍ॅक्शन मोडमध्ये,पूजा चव्हाण प्रकरणाची घेतली माहिती ; राठोडांवर कोणत्याही क्षणी कारवाई?

मुख्यमंत्री अ‍ॅक्शन मोडमध्ये,पूजा चव्हाण प्रकरणाची घेतली माहिती ; राठोडांवर कोणत्याही क्षणी कारवाई?

🔸अशोक काळकुटे | संपादक

मुंबई- पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. मुख्यमंत्र्यांनी पूजा आत्महत्याप्रकरणातील सर्व माहिती घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्यावर कोणत्याही क्षणी कारवाई होण्याची शक्यता बळावली असून राठोड राहणार की जाणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

बीडच्या पूजा चव्हाणने आत्महत्या केली. त्यानंतर कथित ११ ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या. या क्लिपमधील आवाज शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचा असल्याचं सांगत या प्रकरणी राठोड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली होती. तर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट पोलीस महासंचालकांनाच पत्रं लिहून या प्रकरणी कारवाईची मागणी केली होती. त्यामुळे राठोड यांच्या अडचणीत वाढ झाली होती. तर राठोड यांच्यावर कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढला होता.

राठोडांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा?

त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रात्री उशिरा या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं. पूजा चव्हाण प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आला? तपासात काय तथ्य आहे? राठोड यांचा कितपत सहभाग आहे? व्हायरल क्लिपमध्ये कितीपत सत्यता आहे? त्यातील आवाज राठोडांचाच आहे का? आधी बाबतची माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली असावी असं सूत्रांनी सांगितलं. या प्रकरणी मुख्यमंत्री गंभीर असून ते राठोडांवर कारवाई करू शकतात, असंही सूत्रांचं म्हणणं आहे. त्यामुळे आजचा दिवस राठोड यांच्या राजकीय कारकिर्दीसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचं मानलं जात आहे.

राठोड मुख्यमंत्र्यांशी बोलणार?

पूजा चव्हाण प्रकरणात नाव आल्यानंतर संजय राठोड हे नॉट रिचेबल आहेत. मात्र, ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलण्याची शक्यता आहे. राज्याचे प्रमुख म्हणून आणि पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे राठोड आपली बाजू मांडण्याची शक्यता आहे. राठोड यांनी बाजू मांडल्यानंतरच मुख्यमंत्री त्यांच्याबाबत कारवाईचा निर्णय घेतील, असं सूत्रांचं म्हणणं आहे. तसेच याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख आणि शिवसेनेच्या स्थानिक आमदारांशीही चर्चा करण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.

मुंडे प्रकरणापेक्षा राठोडांचे प्रकरण वेगळे

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही आरोप झाले होते. मुंडे यांनी त्यांच्या दुसऱ्या संबंधाची जाहीर कबुली देत त्याचं दायित्वही स्वीकारल्याचं सांगितलं होतं. तसेच त्यांच्यावर करण्यात आलेले अत्याचाराचे आरोप त्यांनी फेटाळून लावले होते. त्यानंतर ज्या महिलेने मुंडेंविरोधात तक्रार नोंदवली तिच्यावर अनेक पुरुषांनी आरोप केले होते. ही महिलाच फसवणूक करत असल्याचं त्यातून दिसून आलं होतं. त्यानंतर या महिलेनेही मुंडेंवरील आरोप मागे घेतले होते. त्यामुळे मुंडे बचावले. परंतू पूजा चव्हाण प्रकरणात थेट पूजानेच आत्महत्या केली आहे. तिने कोणताही आरोप केला नसला तरी व्हायरल ऑडिओ क्लिपमधून अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. त्यामुळे राठोड हे अधिक अडचणीत आले आहेत. मुंडे प्रकरणापेक्षा हे प्रकरण अधिकच धक्कादायक असल्याने राठोड यांच्यावर कारवाई होऊ शकते, असं सूत्रांचं म्हणणं आहे.

error: Content is protected !!