ब्रेकिंग न्युज
वाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान स्मशानभूमी अभावी अंत्यसंस्कार करताना वाद ही लाजीरवाणी बाब मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला सोयरसुतक नाही:- डॉ.गणेश ढवळेसोयाबीन पेरणी पूर्वी उगवण क्षमता तपासा :- कृषी विभागाचे आवाहन.स्नेह-75 च्यावतीने जागतिक कुटूंब दिनानिमित्त शर्मा परिवाराचा सत्कारजामखेड कृषी उत्पन्न बाजारचे सभापती पै. शरद कार्ले यांच्या सभापती पदाची वर्षपुर्ती.घाटशीळ पारगावात व्यापाऱ्याला मारहाणटँकरने पाणी पुरवठाबाबत अडचणी आल्यास संपर्क क्रमांकावर तक्रार करावीजातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवजामखेड येथे मधूरजल प्युअर वाॅटर चे उद्घाटन संपन्नरणविर काका पंडीत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

‘मी पुन्हा येईन’ असं तीनवेळा म्हणालो नव्हतो ; संजय राऊतांचा फडणवीसांना चिमटा.

‘मी पुन्हा येईन’ असं तीनवेळा म्हणालो नव्हतो ; संजय राऊतांचा फडणवीसांना चिमटा.

🔸अशोक काळकुटे | संपादक

– “मी पुन्हा येईन, पुन्हा येईन, पुन्हा येईन असे तीन वेळा म्हणालो नव्हतो, हे लक्षात घ्या,” अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. यावेळी संजय राऊतांनी अप्रत्यक्षरित्या भाजप नेते देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. नाशिकच्या कालिदास कला मंदिर या ठिकाणी एका कार्यक्रमात बोलताना संजय राऊतांनी टीका केली.

नाशिकच्या कालिदास कलामंदिर येथील एका कार्यक्रमात संजय राऊतांनी हजेरी लावली. यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि संजय राऊत यांनी हजेरी लावली. विशेष म्हणजे छगन भुजबळ आणि संजय राऊत या कार्यक्रमाच्या निमित्ताने दोघेही एकाच व्यासपीठावर हजेरी लावली.

“गेल्यावर्षी यांच्या कार्यक्रमातून मी थोडं लवकर गेलो. मी त्यावेळी नक्की येईन असे म्हणालो होतो. त्यांना वाटलं मी येणार नाही. पण मी पुन्हा येईन, पुन्हा येईन असे तीन वेळा म्हणालो नव्हतो. हे लक्षात घ्या,” असेही संजय राऊत म्हणाले.

“हे शब्द देखील पाळतात, असं तुम्ही म्हणालात. देखील म्हणजे काय? जे शब्द पाळत नाही. त्यांना आम्ही घरी पाठवतो,” अशी खोचक टीका संजय राऊतांनी केली. त्यावेळी राऊतांनी फडणवीसांवर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला.

error: Content is protected !!