ब्रेकिंग न्युज
लोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी लिंबागणेश येथील फेव्हीस्टीक प्रकरणामुळे संवेदनशील मतदान केंद्राचा आयजी विरेंद् मिश्रा,एसपी नंदकुमार ठाकूर  यांच्याकडून आढावा जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजी

*महाविकास आघाडी सरकार व महावितरण कंपनीला भाजपच्या वतीने चेतावणी देत निषेध*

*महाविकास आघाडी सरकार व महावितरण कंपनीला भाजपच्या वतीने चेतावणी देत निषेध*

उमेश कोळी जिल्हा प्रतिनिधी

 

भारतीय जनता पार्टी मुक्ताईनगर तालुक्याच्या वतीने महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता व तहसीलदार यांना चेतावणी देऊन निवेदन देण्यात आले की, कोरोना महामारी मुळे शेतकरी, व्यावसायिक बेरोजगार झाले होते त्यामुळे ते जेमतेम उपजीविका भागवत आहे आणि महाविकास आघाडी सरकार वीजबिल वसुलीसाठी तगादा लावत आहे.

 

महाविकास आघाडी सरकार मधील ऊर्जामंत्री यांनी घोषित केले होते की शेतकऱ्यांना १००% वीजबिल माफी करण्यात येईल व घरगुती वापर असलेल्या ग्राहकांना १०० युनिटवर ३०% वीजबिल माफी करू. प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारे अंमलबजावणी न करता क्रूरपणे कोरोना काळातील थकबाकीदार शेतकरी, व्यापारी यांना कोणतीही लेखी सूचना न देता वीज कनेक्शन कट करण्यात येत आहे. हा जनतेवर होत असलेला अन्याय भारतीय जनता पार्टी सहन करणार नाही.

 

  1. शेतकऱ्याचे वीज कनेक्शन कट केल्यास भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल हे शेतकरी विरोधी सरकारने लक्षात ठेवावे. त्यासाठी महावितरणला निवेदन देण्यात आले. याप्रसंगी बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाचे राष्ट्रीय संयोजक डॉ राजेंद्रजी फडके, माजी जि.प.अध्यक्ष अशोकभाऊ कांडेलकर,तालुका सरचिटणीस चंद्रकांत भोलाने, विनोद पाटील, भाजयुमो तालुका अध्यक्ष अंकुश चौधरी, कर्की सरपंच दत्ताभाऊ पाटील, नरवेल सरपंच मोहन महाजन,सुनील महाजन संतोष खोरखोडे पंकज पाटील,विशाल महाजन अतुल महाजन,काशिनाथ कोळी,ईश्वर मिस्तरी व सर्व शेतकरी बंधू व कार्यकर्त्यांसह उपस्थित होते.
error: Content is protected !!