ब्रेकिंग न्युज
लोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी लिंबागणेश येथील फेव्हीस्टीक प्रकरणामुळे संवेदनशील मतदान केंद्राचा आयजी विरेंद् मिश्रा,एसपी नंदकुमार ठाकूर  यांच्याकडून आढावा जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजी

माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची बहीण आणि मेहुणे अपघातात ठार.

माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची बहीण आणि मेहुणे अपघातात ठार.

🔸अशोक काळकुटे | संपादक

गेवराई- कल्याण-विशाखा पट्टनम राष्ट्रीय महामार्गावरील गेवराई तालुक्यामध्ये असलेल्या मातोरी-तिंतरवणी जवळ झालेल्या कारच्या भीषण अपघातात भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची चुलत बहीण आणि मेहुणे जागीच ठार झाले आहेत.
सविस्तर असे कि,
बीड जिल्ह्यातील तिंतरवणी-मातोरी च्या दरम्यान बुधवार दि.२४ फेब्रुवारी २०२१ रोजी सायंकाळच्या सुमारास सुधीर मुनगंटीवार यांच्या चुलत बहीण ममता तगडपल्लेवार आणि मेहुणे विलास तगडपल्लेवार हे दोघे पुसद येथून चारचाकी वाहनाने पुण्याला स्वतःच्या मुलाला भेटण्यासाठी निघाले होते. परंतु प्रवासादरम्यान मातोरी-तिंतरवणी दरम्यान चार चाकी गाडी क्रमांक एम.एच. २९ ४२३० भरधाव वेगात असताना अचानक गाडी पुलावरून खाली कोसळली यामध्ये दुर्दैवाने दोघा पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे.
घटनास्थळी चकलांबा पोलिस दाखल झाले असून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे.
दरम्यान या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

error: Content is protected !!