ब्रेकिंग न्युज
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना वादळाचा बसणार तडाखा; ताशी 40 KM वेगाने वाहणार वारेलोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी लिंबागणेश येथील फेव्हीस्टीक प्रकरणामुळे संवेदनशील मतदान केंद्राचा आयजी विरेंद् मिश्रा,एसपी नंदकुमार ठाकूर  यांच्याकडून आढावा जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !

प्रेमासाठी खावाच लागतो एखादा धक्का

रेश्मा सावित्री गंगाराम

प्रेमात पडलं की समाजमान्यता मिळते. स्टेटस मिळतं. हे स्टेटस चारचौघात मिरवता येतं. या उद्देशानंही नव्या पिढीतले अनेक जण प्रेमात पडतात. पण प्रेमातली आडवळणं, धक्के, अपमान याचा अनुभव गाठीशी आल्यावर त्यांना प्रेमाचा खरा अर्थ समजतो. या नव्या पिढीचा हा प्रवास समजून घेण्यासाठी रेश्माची ही गोष्ट वाचायलाच हवी.

प्रेम करणं अवघड की सोपं? मग करायचं की नाही? असे बरेच प्रश्न शाळेत असल्यापासून  मनात घर करुन असायचे. कारण घरात कधीच या विषयावर मोकळेपणाने कुणी बोललं नाही. आई, बाबा, ताई यांच्याकडून बोलण्यातून हे कळालं असतं तर मला प्रेम व्यक्त करताना लाज वाटली नसती, असं वाटतं. या मागची कारणं भयानक आहेत. आज त्यात काही बदल होतील किंवा झालेत असं नाही.
माझं मूळ गाव नांदेडमधल्या बिलोली तालुक्यात. मुलगा जन्माला यावा म्हणून आम्ही आठ मुली जन्माला आलो. मुलगा आणि मुलगी म्हणून वाढताना मोठी दरी जाणवत होतीच. मुलीचं शिक्षण, लग्न ही जबाबदारी आई बाबांवर होती. अशात गावी राहून होणार काय? शेती करुन भागणार नाही. या विचारानं स्वप्नांचं शहर गाठलं.
हाताला मिळेल ते काम त्यांनी केलं. आम्हाला त्याची कधीच झळ बसली नाही. पण मुलीनं असं वागावं किंवा असंच असावं ही लक्ष्मणरेषा अप्रत्यक्ष रित्या आखली गेली. आम्ही त्याला विरोध केला. आकाशात उडण्याची स्वप्न पाहिली. तेव्हाही घरच्या लोकांनी साथ सोडली नाही. शाळेत सातवीत असताना वेगवेगळे विचार डोक्यात घोळ घालायचे. आपण विचार करतो तसंच सगळे लोक करतात का? या प्रश्नानं अनेक प्रश्न निर्माण केले.
प्रेम या विषयापासून बरीच लांब होते. काही गोष्टी समजण्यापलीकडच्या होत्या आणि समजावणारंही कुणी नव्हतं. मनात आलंय ते कुणाला तरी सांगावं या विचारानं मैत्रिणीसोबत बोलून एका मुलाला विचार, असं सांगितलं. त्यावर ती मुलगी काळी आणि आमच्या जातीची नाही, असं तो मुलगा म्हणाला. डोकं भिनभिनलं! आपण ज्या जगाचा विचार करतो आहोत ते हे जग नाही याची जाणीव झाली.
या सगळ्याचा त्रास झाला. कुणासोबत बोलावं असं वाटलं नाही. मानसिक त्रास होतच होता. ‘हम काले है तो क्या हुआ दिलवाले हैं।’ हे गाणं तेव्हा आवडायला लागलं होतं. प्रेम करावं तर जातीतल्याच माणसावर का? या प्रश्नानं पाठ सोडली नाही. पण नव्यानं सुरवात करावी असंही मनात वाटत होतं.
पुन्हा प्रवास त्याच दिशेनं सुरू झाला. नववीत असताना जातीतल्या मुलाला विचारलं. त्याने आनंदाने होकार दिला. आम्ही कधीतरी भेटायचो. काही बोलणं होत नव्हतं. तरी भेटत रहायचो. चार वर्ष कुठच्या कुठं निघून गेली. कळालंही नाही. ‘आपणं घरी सांगू या’ या निर्णयापर्यंत मी पोचले होते. पण प्रेम काय असतं याची समज त्याला नव्हती. ते त्याला समजूनही घ्यायचं नव्हतं, असंही सतत जाणवायचं. मलाही या सगळ्याची जाणीव, समज फार कमीच होती, असं आता राहून राहून वाटतं. 
‘आमचं एकमेकांवर प्रेम आहे’ यापलीकडे त्यात खास काहीच नव्हतं. आकर्षण मात्र होतं. त्याची सौभाग्यवती म्हणून मी मिरवावं यातच त्याला आनंद मिळत होता. ज्यात मला अजिबात रस नव्हता. लग्न करुन मुलाबाळांना जन्म द्यायचं आणि घर काम करायचं या पलिकडे माझं आयुष्य नसतं असं त्याचं म्हणणं होतं. त्यावर प्रेम करून मी चुकले असंही वाटत रहायचं. 
प्रेम ही भावना कायम जपता आली पाहिजे. बंधनात नाही तर सोबत राहता आलं पाहिजे. पुढे कॉलेज बाहेर पडले आणि प्रेम ही संकल्पना हळूहळू समजू लागली. आज ही प्रेम म्हटलं की, अनेक लोक आणि अनेक प्रसंग डोळ्यासमोर येऊन जातात.
प्रेम काय असतं हे समजायला तसा उशीरच झाला. खुलेपणाने चर्चा झाल्या तर प्रेमाची संकल्पना आपसूक बदलून जाईल. त्यासाठी प्रेमातल्या चौकटी मोडून काढायला हव्यात. समाजमान्यता म्हणून अनेक जण प्रेमात पडतात. तात्पुरतं स्टेटस हवं असतं. त्यातून नेमकं होतं काय? तर चारचौघात मिरवता येतं. 
ते स्टेटस मिरवत असताना प्रेमाचा खरा अर्थ आपण शोधत रहायला हवा. नकळत्या वयात प्रेमात पडले. पण त्या प्रेमातली आडवळणं, धक्के, अपमान याचा अनुभव गाठीशी नसता तर प्रेमाचा खरा अर्थ समजला असता का? असा प्रश्न कधीकधी स्वतःला विचारावासा वाटतो. आपण ज्या जगाचा विचार करतो ते जग तितकंसं खरं नाहीय याची जाणीव त्या अनुभवांनी दिली.
आजचा काळ सोशल मीडियातून जोड्या जुळवण्याचा आहे. वर्चुअल जगानं तरुणाईवर गारुड केलंय. त्याच वर्चुअल जगाची भाषा प्रेम बोलतं. अर्थात हे फार उशिराने समजत जातं. त्यासाठी एखादा धक्काही मिळावा लागतो.

(रेश्माने पब्लिक रिलेशन या विषयात मास्टर्स केलं असून सध्या ती सलाम बॉम्बे फाउंडेशन या संस्थेत काम करतेय)

साभार:कोलाज

error: Content is protected !!