ब्रेकिंग न्युज
आमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजीआज12 मे जागतिक परिचारिका दिनानिमित्तग्रामदैवत सालशिदबाबा यात्रा उत्सव उद्या दिनांक १२/०५/२०२४ वार रविवार यात्रेचे आयोजनआज कडा येथील उपमुख्यमंत्री अजित पवार व छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जाहीर सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.-आ. बाळासाहेब आजबे यांचे आवाहनजामखेड येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरीरोहितला राज्याचा नेता होण्याची घाई आणि लंकेंना लोकसभेत जाण्याची घाई – उपमुख्यमंत्री अजित पवार

गजा मारणे टोळीनंतर नीलेश घायवळ टोळी पोलिसांच्या रडारवर ; चॉपरचा धाक…

गजा मारणे टोळीनंतर नीलेश घायवळ टोळी पोलिसांच्या रडारवर ; चॉपरचा धाक…

🔸अशोक काळकुटे | संपादक

नवी मुंबईच्या तळोजा जेलमधून सुटल्यानंतर गजा मारणे याने मुंबई-पुणे एक्स्सप्रेसवेवर मोठं शक्तीप्रदर्शन केलं. यानंतर पुणे पोलिसांनी त्याच्यावर गुन्हाही दाखल केला. आता गजा मारणे टोळीनंतर नीलेश घायवळ टोळी पोलिसांच्या रडारवर आली आहे.

चॉपरचा धाक दाखवून रॅलीसाठी जबरदस्तीने जीप घेऊन जाणाऱ्या घायवळ टोळीतील ०८ जणांवर गुन्हे शाखेच्या पथकाने खंडणीविरोधी दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे तर दोघांना अटक देखील केली आहे.

संतोष आनंद धुमाळ (वय ३८, रा. भूगाव, ता. मुळशी) आणि मुसाब ऊर्फ मुसा इलाही शेख (वय २९, रा. शास्त्रीनगर, कोथरूड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. एका व्यावसायिकाने याबाबतची माहिती दिली आहे.

तक्रार करणारी व्यक्ती गॅरेजमध्ये काम करत होती. त्यावेळी निलेश घायवळ टोळीतील संतोष धुमाळच्या सांगण्यावरुन कुणाल कंधारे, मुसाबा शेख, अक्षय गोगावले, व इतर चार अशा आठ जणांनी चॉपरचा धाक धाकवून त्यांची जीप चोरुन नेली.

अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहाय्यक आयुक्त लक्ष्मण बोराटे, पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस उपनिरीक्षक विजय झंझाड यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

error: Content is protected !!