ब्रेकिंग न्युज
विजयराव औटींनी सांगितले विखेंना पाठिंबा देण्याचे कारण…आज आष्टी तालुक्यातील वाघळुज येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत संवाद बैठककाँग्रेसने ५० वर्ष गरीबी हटवण्याचे खोटे आश्वासन दिले – नरेंद्र मोदीजामखेड येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ९ मे रोजी सभाकाँग्रेसने ५० वर्ष गरीबी हटवण्याचे खोटे आश्वासन दिले – नरेंद्र मोदीआ. राम शिंदे यांची डोणगाव येथे कॉर्नर सभा पुन्हा एकदा डॉ सुजय विखे यांना निवडून आणायचे – आ.प्रा.राम शिंदेजगदज्योती महात्मा बसवेश्वर जयंती च्या अध्यक्ष पदी अजय रुकर तर सचिव पदी संदीप कापसेहर घर लंके का डंका, गल्ली बोळात तुतारी चा नाद घुमला डफड प्रचार ,जोरदार चर्चाअंबाजोगाई येथे विश्व वारकरी संघा च्या वतीने एक दिवशीय विराट किर्तन महोत्सवआळंदीत श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी नामजयघोषात

वैद्यनाथ साखर कारखान्याने केले दोन लाख मेट्रिक टन उसाचे गाळप

वैद्यनाथ साखर कारखान्याने केले
दोन लाख मेट्रिक टन उसाचे गाळप

परळी (प्रतिनिधी) पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने दोन लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतकरी व नागरीकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आणि अनेक अडचणींवर मात करीत कारखान्याच्या अध्यक्षा, माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यनाथ कारखाना चालू झाला आहे. ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगार यांचे हीत लक्षात घेऊन वैद्यनाथ कारखाना सुरू करण्यात आला असुन यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण दुर झाली आहे. आर्थिक आणि नैसर्गिक आपत्तीमुळे वैद्यनाथ कारखाना अडचणीत आला होता. मात्र माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांनी यावर्षी कारखाना सुरू करून यशस्वीरित्या चालू केला आहे.
वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने सन 2020-21 या गळीत हंगामात दिनांक 25 फेब्रुवारीपर्यंत 2 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले असुन 1 लाख 75 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे तर सरासरी साखर उतारा 10. 44 टक्के असल्याचे कारखान्याच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान कारखान्याने गाळपाची यशस्वी परंपरा कायम राखल्याबद्दल कारखान्याच्या अध्यक्षा पंकजाताई मुंडे सर्व संचालक मंडळ यांनी ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोड मजूर, मुकादम, कर्मचारी, अधिकारी यांचे अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!