ब्रेकिंग न्युज
सत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजीआज12 मे जागतिक परिचारिका दिनानिमित्तग्रामदैवत सालशिदबाबा यात्रा उत्सव उद्या दिनांक १२/०५/२०२४ वार रविवार यात्रेचे आयोजनआज कडा येथील उपमुख्यमंत्री अजित पवार व छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जाहीर सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.-आ. बाळासाहेब आजबे यांचे आवाहनजामखेड येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरीरोहितला राज्याचा नेता होण्याची घाई आणि लंकेंना लोकसभेत जाण्याची घाई – उपमुख्यमंत्री अजित पवारविखेंच्या धनशक्तीसमोर लंकेंची जनशक्ती भारी – आ.भास्कर जाधव

शेती व शेतकरी समृद्धीसाठी माती परिक्षण महत्वाचे-जाधव

शेती व शेतकरी समृद्धीसाठी माती परिक्षण महत्वाचे-जाधव
कृषी विभागाचे रांजणी येथे माती परिक्षण व मार्गदर्शन शिबीर संपन्न
बीड ः शेतीच्या माध्यमातून समृद्धी मिळवायची असेल तर आता शेतकर्‍यांना पारंपारिक पद्धतीच्या शेतीची कास सोडावी लागणार आहे. माती परिक्षण, जमिन आरोग्य पत्रीकांच्या माध्यमातून आपल्या शेतीच्या आरोग्याचं योग्य निदान व उपचार शेतकर्‍यांनी करणं गरजेचं आहे. त्याशिवाय आपली शेती फायदेशीर व समृद्धी देणारी ठरणार नाही, असे प्रतिपादन कृषी सहाय्यक व्ही. डी. जाधव यांनी केले.
गेवराई तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने रांजणी येथे माती परिक्षण व जमीन आरोग्य पत्रिका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तालुका कृषी अधिकारी बी. टी. सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात कृषी सहाय्यक व्ही.डी. जाधव, गणेश वाणी, आर. आर. चव्हाण आदींनी शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले. यावेळी गणेश वाणी यांनी हवामानावर आधारीत शेती करतांना माती परिक्षण करुण घेणे गरजेचे आहे. आपल्या जमिनीचा पोत कसा आहे, त्यामध्ये कुठल्या घटकांची मात्रा कमी किंवा अधिक आहे हे जाणून घेतल्यानंतर भरघोस पिकांच्या उत्पादनांसाठी योग्य त्या उपाययोजना करणे शक्य होते. माती परिक्षण, जमिन आरोग्य पत्रिका तयार करतांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहनही त्यांनी केले. तर आर. आर. चव्हाण यांनी माती परिक्षणाचे महत्व व शेतकर्‍यांच्या आर्थिक उन्नतीत असलेले योगदान विषद केले. यावेळी कृषी सहाय्यक व्ही. डी. जाधव यांनी पोकरा योजनेतून शेतकर्‍यांना लाभ घेता येणार्‍या योजनांची माहिती दिली. तसेच भरघोस उत्पन्नांच्या लालसेपोटी रासायनिक खतांचा झालेला भरमसाठ वापर यामुळे जमिनींचा पोत खराब झालेला आहे. त्यामुळे खतांची मात्रा वाढवून उत्पन्न वाढणार नाही तर पिकांना कुठल्यावेळी कोणते खत किती प्रमाणात द्यावे हे जाणूण घेण्यासाठी शेतकर्‍यांनी माती परिक्षण करुन घेण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी अमोल करांडे, सरपंच राम जाधव, उपसरपंच बळीराम कदम, भारत करांडे, गणेश करांडे, प्रभाकर ससाणे, आसाराम रोडगे, मनोज करांडे, महारुद्र सावंत यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!