ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी बंजारा समाजाची बदनामी केल्या प्रकरणी भाजपाच्या “या” नेत्यावर गुन्हा दाखल

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यात या प्रकरणी भारतीय जनता पक्षाने बदनामी केल्याचा आरोप बंजारा समाजाने लगावला आहे. ही तक्रार बंजारा समितीचे युवा जिल्ह्याध्यक्ष श्याम राठोड यांनी केली असल्याचे वृत्त समोर येत आहे.

विधानसभा आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेत्यांसह बड्या नेत्यांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजप आमदार अतुल भातखळकर, भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ, आमदार अशिष शेलार, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार प्रसाद लाड यांची नाव घेण्यात आली आहेत.

या प्रकरणात पूजा चव्हाण हिची बदनामी झाली पण त्याच बरोबर समोरून समाजाची आणि तिच्या परविअरची बदनामी करण्यात आली आहे असे तक्रारीत म्हटले आहे. मात्र भाजपाच्या नेत्यांनी पोलीस स्थानकांमध्ये जाऊन पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव टाकत तपासात अडथळा निर्माण केला असल्याचं दाखल केलेल्या तक्रारीमध्ये म्हटलं आहे

error: Content is protected !!