ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

आमदाराच्या स्वप्नांना कार्यकर्त्यांची साथ

आमदाराच्या स्वप्नांना कार्यकर्त्यांची साथ

आमदार रोहित पवार विचार मंच च्या वतीने स्वच्छता मोहीम हाती

जामखेड प्रतिनिधी

स्वच्छ जामखेड, सुंदर जामखेड, हरित जामखेड
आमदार रोहित दादा पवार आणि सुनंदाताई पवार यांनी एक संकल्प केला आहे जामखेडला स्वच्छतेच्या बाबतीत महाराष्ट्र मध्ये एक नंबर आणायचा आहे हा निश्चय मनाशी धरून जामखेड येथील प्रभाग क्रमांक सहा व सात मध्ये आमदार रोहित दादा पवार विचार मंच च्या वतीने आज सकाळी साडे सहा ते साडेसात वाजेपर्यं डोके किराणा परिसर राजमाता जिजाऊ नगर या परिसरात स्वच्छतेसाठी मोहीम राबवण्यात आली यावेळी कार्यकर्त्यांनी स्वच्छता केली .

या प्रसंगी शहराध्यक्ष राजेंद्र गोरे, सचिन शिंदे, राष्ट्रवादी युवक शहर उपाध्यक्ष ऋषिकेश कुंजीर, जिल्हा परिषदप्राथमिकचे शिक्षक शिवाजी घोडके,संतोष देशमुख, विठ्ठल घोडे , रामेश्वर डूपलवार, शिवाजी काळदाते,अविनाश वाघमारे ,डॉ हनुमंत शिंदे ,प्रवीण शिंदे, बापू डोके, सुपेकर दाजी,गणपत भणगे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजेंद्र गोरे बोलताना म्हणाले की आपण शहरातील स्वच्छता आपल्या स्वच्छेने करून शहराला सुंदर करावे तसेच शहरातील सर्व नागरिकांनी व युवकांनी यामध्ये सहभाग घ्यावा व आपल्या घरातील कचरा जामखेड नगर परिषदेच्या घंटागाडीचा टाकावा आणि जामखेडच्या विकासाला आमदार रोहित दादांच्या आणि सुनंदा ताईंच्या स्वप्नांना साकार करण्याचा प्रयत्न करावा त्यासाठी मी आपल्याला आवाहन करत आहे तुम्हीपण थोडावेळ काढून आमच्यासोबत सहभाग नोंदवावा .
येत्या काही दिवसात स्वच्छ सर्वेक्षणाची चळवळ संपूर्ण शहरात चालू करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
आपण जामखेडसाठी, जामखेडच्या स्वच्छतेसाठी हातभार लावू असेही ते म्हणाले.

error: Content is protected !!