ब्रेकिंग न्युज
गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगी

सांगलीत उपसरपंच निवडणुकीवेळी ग्रामपंचायत सदस्याची हत्या ; ३९ जणांवर गुन्हे दाखल.

सांगलीत उपसरपंच निवडणुकीवेळी ग्रामपंचायत सदस्याची हत्या ; ३९ जणांवर गुन्हे दाखल.

🔸 अशोक काळकुटे | संपादक

सांगलीमध्ये उपसरपंच निवडणुकीत झालेल्या वादातून झालेल्या भाजपच्या ग्रामपंचायत सदस्याच्या हत्येप्रकरणी सात जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
सांगलीतील कवठेमहांकाळ पोलिसांनी दोन्ही गटातील जवळपास ३९ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगावमध्ये काल उपसरपंच पदाच्या निवडीवेळी मारहाण झाली होती. त्यानंतर बोरगाव गावात आजही मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
बोरगावातील पांडुरंग काळे (वय ५५) या ग्रामपंचायत सदस्याची काल ०४ मार्च २०२१ रोजी हत्या झाली होती. पांडुरंग काळे हे भाजपचे सदस्य असल्याची प्राथमिक माहिती आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनीच त्यांची हत्या केल्याचा दावा करण्यात येत आहे.
बोरगावमध्ये या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादीचे ०२ जण गंभीर जखमी.

उपसरपंच पदाच्या निवडणुकीवरुन झालेल्या मारहाणीत पांडुरंग काळे यांना प्राण गमवावे लागले. यावेळी राष्ट्रवादीचे दोन सदस्य देखील जखमी झाल्याचीही माहिती आहे. पोलिसांकडून या घटनेची चौकशी सुरु करण्यात आली आहे. पांडुरंग काळे यांच्या खून प्रकरणामुळे गाव पातळीवरील ग्राम पंचायत निवडणुकांमध्ये होणारे राजकारण कोणत्या पातळीवर पोहोचले आहे, हे पाहायला मिळत आहे.

भाजप कार्यकर्त्यांवरच हत्येचा आरोप.

पांडुरंग काळे यांचा उपसरपंचपदाच्या निवडीच्या वादातून भाजपच्या कार्यकर्त्यांनीच खून केल्याचा आरोप केला जात आहे. घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. स्वतः जिल्हा पोलिस प्रमुख घटनास्थळी दाखल झालेले आहेत. काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी अधिक तपास सुरु केला आहे.

error: Content is protected !!